Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

गणपती बाप्पांची नापसंती

अनिता व्यवहारे ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर

0 4 8 2 9 0

गणपती बाप्पांची नापसंती

श्रावण सरला, भाद्रपद आला
सान -थोरांच्या मनी उत्साह दाटला
देवदूतांनी स्वर्गी निरोप धाडला
यावे गणराया, आनंद सोहळ्याला!

गणेशोत्सव अगदी दारात आला आहे. “गणपती बाप्पा लवकर या” या घोषणांनी आसमंत दुमदुमला. पण आजच्या उत्सवाकडे पाहिलं, तर दिसतं ते भव्यतेचं झगमगाट… साधेपणा मात्र हरवलाय.

जय देव जय देव जय मंगलमूर्ती..||
दर्शन मात्रे मनकामना पुर्ती!||

ही ओवी सांगते की, भक्तीचं समाधान हे केवळ दर्शनाने होतं. तरीही आपण दिखाव्याच्या स्पर्धेत गुंतून गेलो, आणि म्हणूनच बाप्पाच्या डोळ्यांत आज नापसंती उमटताना दिसते. पूर्वी हा उत्सव श्रद्धेचा, एकोप्याचा आणि समाज जागृतीचा होता. लोकमान्य टिळकांनी दिलेलं सार्वजनिक स्वरूप देशभक्तीचं बीज घेऊन आलं. साधी मातीची मूर्ती, गुळखोबऱ्याचा नैवेद्य, आरत्या, भजनी मंडळं, लोकशिक्षणाचे कार्यक्रम इतक्यातच बाप्पा खूश व्हायचे.

मूर्ती होती साधी, पण भावना होत्या भव्य
आरतीच्या सुरांत मनं एकत्र गुंफली जायची.

आज मात्र…
शाडूच्या मातीऐवजी प्लास्टरच्या मूर्ती,
आरतीऐवजी डीजेचा गोंगाट,
श्रद्धेपेक्षा स्पर्धा आणि अहंकार…¡

मूर्तीचा आकार झाला भव्य, पण भक्तिभाव झाला लहान!
आरतीपेक्षा डीजेच्या तालाने फुटले कान!
यामुळे बाप्पा जणू सांगतात,
“नको मला मोदक-खिरापत,
हवाय फक्त तुमचा साधा-भोळा भाव!”

प्रदूषण, पैशांचा अपव्यय, नद्यांची दैना… हीच खरी विघ्ने आता माझ्या आगमनामुळे निर्माण होताहेत, असं बाप्पाचं मन व्यथित होतं. म्हणून आपणच ठरवायचं आहे… बाप्पा “ना पसंतीने” यावेत की “आतुरतेने” यावेत? आपण जर हा उत्सव पर्यावरणपूरक, साधा, भक्तिभावपूर्ण, समाजोपयोगी केला, तर बाप्पाचं मनही प्रसन्न होईल.

करा करा तयारी माझ्या उत्सवाची
मला लागली आतुरता भेटण्याची!
||गणपती बाप्पा मोरया||

अनिता व्यवहारे
ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे