
0
4
8
2
9
0
गुलमोहर
रणरणत्या उन्हात फुलला
रक्तवर्णी हा गुलमोहर
सृष्टीत रंग विखुरतो
त्याचा लालेलाल बहर…
पोपटी पर्ण कोवळे
पाहून रंग हासरा
विसावल्या तप्त झळा
लाल रंगात विरला वारा…
वैशाख दाह झेलतो
निश्चल उभा देखणा
नभास साद घालतो
धरेवरील हा नजराणा…
दु:खाच्या प्रवासात
खंबीरतेने उजळावे
लालजर्द फुलांचा
गुलमोहर होवून जावे
गुलमोहर होवून जावे…
आशा कोवे गेडाम
वणी जि.यवतमाळ
0
4
8
2
9
0



