
0
5
1
7
5
8
महिला दिन
इंग्रजीत म्हणतात लेडी, मराठीत म्हणतात महिला,
जिच्यामुळे आपण घेतो या जगात पहिला श्वास निराळा.
कन्यारत्न तू, घराची शोभा, भवितव्याची आशा,
तुझ्या हास्याने उजळते प्रत्येक घराची भाषा.
बहीण बनून प्रेम देतेस, संकटात उभी राहतेस,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर साथ नेहमीच देतेस.
अर्धांगिनी बनून संसाराची गाडी पुढे नेत असतेस,
त्याग, प्रेम आणि संयमाने घराचे मंदिर घडवितेस.
आई बनून मायेचा सागर, प्रेमाची तू सावली,
तुझ्या कुशीतच मिळते जगातील सर्वात मोठी शांती.
म्हणूनच आजचा हा दिवस तुझ्या सन्मानाचा असावा,
प्रत्येक स्त्रीच्या त्यागाला आज नम्र मुजरा व्हावा.
पूर्ण होवोत तुझ्या सर्व इच्छा, आनंद तुझ्या वाट्याला यावा, प्रत्येक स्त्रीच्या जीवनात सुखाचा सूर्य उजळावा.
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
उमरगा, जि. धाराशिव
0
5
1
7
5
8



