0
4
8
2
8
4
झिपोट्या
माय तुझ्या गं झिपोट्या
दिसत्यात आंबाड्यावाणी
पायात काटा गं रूतेल
किती फिरतेस अनवाणी ?
तुझ्या पांढऱ्या झिपोट्या
सर्वदा तेलासाठी तरसती
लेकरांच्या गं पोटासाठी
किती करतेस गं कसरती ?
झिपोट्या तुझ्या लांबसडक
घामात भिजून सदा कडक
लालभडक कुंकू गं कपाळी
लंका पार्वतीचं जीणं भाळी
हातातोंडाची पाडताना गाठ
पाठ दाखवली ना कष्टाला
नाही शाम्पू ,कंगवा नि तेल
कधी सुकली ना अमृतवेल
पाळणा करून गं पदराचा
मोठं केलंस गं भरवून घास
पायधूळ लावून माय माथी
सेवा तुझीच हा अंतीम ध्यास
संग्राम कुमठेकर
बोधेनगर, जि.लातूर
0
4
8
2
8
4



