Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

कुठेही कमी न पडण्यासाठी, ‘आभारीय शब्दसुमनांजली’

मनोगतीय आभार

0 4 8 2 8 6

कुठेही कमी न पडण्यासाठी, ‘आभारीय शब्दसुमनांजली’

नेहमीप्रमाणेच नाइट ड्युटीवरून आल्या आल्या मोबाईल चाळला तर 8.17 वाजता आ. राहूल दादांचा तो जादुई मेसेज ‘तुमचा फोटो पाठवा’ नजरेस पडला. आणि तात्काळ फोटो धाडला.. कुठे का असेना लाॅटरी लागली एवढे नक्की. थोडी झोप घेऊन उठलो आणि सव्वा आकरा वाजता सर्वोत्कृष्ट पोष्टरवर ‘कमी पडलो तर…?’ या कवितेचे पोष्टर झळकले. हा एक सुखद धक्का होताच.

‘कमी पडलो तर ?’ या विषयाच्या अनुषंगाने आशय निवडीवर खूप विचार केला आणि माझ्या आवडीचा प्रेम हाच आशय निवडला. खरे तर खर्‍या प्रेमात जेव्हा अपेक्षा येतात तेव्हा कधीतरी उपेक्षा ठरलेलीच. मात्र फक्त देण्याच्या उदात्त भावनेने प्रेम केले तर मात्र अपेक्षाभंगाचा प्रश्नच उरत नाही. हीच थीम मांडण्याचा प्रयत्न केला आणि परिक्षकांनाही तो भावला.

प्रेम म्हंटले की पुरूष जोडीदाराकडे भौतिक सुखोपभोगाच्या वस्तूंची मागणी किंवा अपेक्षा स्री जोडीदाराकडून ओघाने येतात.. अर्थात यात गैर काहीच नसले तरी मर्यादा असणे फार आवश्यक आहे. शिवाय आपल्या क्षमतांचा विचार सुद्धा महत्वाचा. आणि नेमके येथेच कमी पडलो तर. ? हा प्रश्न खूपच मोठा पेच निर्माण करून जातो. हेच मी मांडले. प्रेम त्यागाच्या मार्गाने फुलवत नेणे. आणि आहे त्यात समाधान मानत, नाही त्याचे दुःख न मानणे. यातच खरे सुख आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटी प्रेम म्हणजे काय? तर एकमेकांना जपणे.. एकमेकावर भाळणे आणि जीवमोलानै सांभाळणे. यामध्ये मानसिक तृप्तीसमोर भौतिक वस्तू गौण ठरल्या जाव्यात. धन, दौलत, सोने, चांदी, गाडी, बंगला ही सर्व साधने आहेत. अंतिम साध्य कदापी होऊ शकत नाहीत. कारण हे सर्व ज्यांच्या कडे आहे अशा लोकांना नैसर्गिक झोप येत नाही. याउलट यातले कांहीच नसणारे जमिनीवर सुद्धा पडल्या पडल्या सुखाची झोप घेतात. मग प्रेम कशात आहे? आणि कोण कुठे कमी पडले? ही समज आणि उमज ज्यांना आली त्यांचेच प्रेम अमर… अन्यथा फक्त समर…. असो..

आदरणीय राहुल दादा, आ. पल्लवीताईजी. मुख्य परिक्षक आ. सविताताईजी, आ. वैशालीताईसाहेब, आ. स्वातीताईंजी, आ. वृंदाताईजी आ. संग्राम दादा, आ. उरकुडे सर जी. आ. लांडगे दादा, आ. तारकाताईजी. आ. सुधाताईजी. आ. शर्मिलाताई, आ. प्रतिमाताई. ग्राफीक्सकार या सर्वांचे अंतःकरणपूर्वक खूप खूप आभार.. तसेच अभिनंदनीय शुभेच्छा देऊन मला प्रोत्साहित केल्याबद्दल सर्व समूह सहकार्‍यांचे देखील अंतःकरणपूर्वक खूप खूप आभार. जाता जाता अजून एक प्रश्न पडला आहे मला तो म्हणजे स्पर्धा उपक्रम चालू आहेत मात्र फोटो न पाठवणाऱ्या शिलेदारांची यादी अजूनही दिसतेच. निकाल आवर्जून वाचावा आणि वेळेत फोटो पाठवून नम्रतापूर्वक सन्मानाचा स्विकार करावा. यामागे मेहनत करणा-या हातांचे मोल कदापी कमी होता कामा नये.. बस्स…!

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

3/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे