सेंट रिंझाई पब्लिक स्कूल सांस्कृतिक स्नेहसंमेलन ‘रेनबो २०२५’ चे थाटात उद्घाटन
डॉ.प्रा. निलिमा डोंगरे, संपादक राहुल पाटील व मा. अशोक पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
सेंट रिंझाई पब्लिक स्कूल सांस्कृतिक स्नेहसंमेलन ‘रेनबो २०२५’ चे थाटात उद्घाटन
डॉ.प्रा. निलिमा डोंगरे, संपादक राहुल पाटील व मा. अशोक पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पहिल्याच दिवशी पालकांचा उदंड प्रतिसाद
रिझांईच्या सर्व शिक्षकांचे परिश्रम कौतुकास्पद
जिल्हा प्रतिनिधी, नागपूर
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर (दि २९ डिसे.): शहरातील उत्तर नागपूर येथील प्रतिष्ठीत सेंट रिंझाई पब्लिक स्कूलचे सांस्कृतिक स्नेहसंमेलन रेनबो २०२५ चे आज (दि २९) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेक्शन सेंटर, लाल गोडाऊन, कामठी रोड, नागपूर येथील सभागृहात डॉ. प्रा. निलिमा जवादे डोंगरे, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, नवी मुंबई, मा. राहुल पाटील, संपादक साप्ताहिक साहित्यगंध व बिनधास्त न्यूज व अध्यक्ष, मराठीचे शिलेदार संस्था, नागपूर व ज्येष्ठ समाजसेवक व शिक्षणप्रेमी मा. अशोक पाटील, चंद्रपूर यांच्या शुभहस्ते थाटात फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सांस्कृतिक महोत्सव ‘रेनबो २०२५’ चा शुभारंभ करण्यात आला. सेंट रिंझाई पब्लिक स्कूलचे प्राचार्य मा. झेनिथ जवादे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा निलिमा डोंगरे, प्रमुख पाहुणे अशोक पाटील व राहुल पाटील यांचे याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
दि २० डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला. तसेच दि २४ डिसेंबर रोजी वर्ग १ ते १० च्या विद्यार्थांनी तयार केलेल्या विविध विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार मिलिंद माने यांच्या हस्ते करण्यात आले.
आज सेट रिंझाईच्या नर्सरी ते वर्ग ४ थी पर्यंतच्या मुला मुलींनी नाट्यछटा विविध प्रकारचे नृत्य सादर करून उपस्थित पालकांची मने जिंकलीत. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचे पालक सहकुटुंब प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनीय भाषणातून पालकांना व मुलांना शैक्षणिक मूल्य रूजविण्यासाठी परिश्रम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे व पालकांनी सर्व मुलांचे कौतुक करून उद्या सादर होत असलेल्या वर्ग ५ ते १० वीच्या मुला मुलींच्या सादरीकरणास शुभेच्छा दिल्यात.
आयोजित वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलनास श्रीमती कुसुम जवादे, मराठीचे शिलेदार संस्थेच्या सचिव पल्लवी पाटील, कु. हर्षिता पाटील, बेबीताई वैद्य, विजेता जवादे, प्रशांत सोमकुवर, राकेश टाकळीकर, लोकमान अन्सारी, धर्मेंद्र मेश्राम, निलेश व सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



