
0
4
8
2
9
0
गंध फुलांचा
रिमझिम पडती श्रावण सरी
आनंदात नाचते बाग सारी..
थेंब थेंब फुलांवरी पडतो..
गंध फुलांचा सर्वत्र पसरतो..
गुलाब म्हणे माझा मोहक बहर
लाल,पिवळ्या रंगात मी दिसतो सुंदर..
टपोऱ्या मोगऱ्याचे नखरेच न्यारे..
पाऊसाचा सरी सोबत सुगंधी पसरे..
सोन्याचा रंगाचा सोनचाफा दिसे.
केशरी पाकळ्यातून तो खुदकन हसे..
रात्रीच फुलतो नाजूक पारिजात..
केशरी देठ त्यांचे भरते मनात…
सोनटक्का,तगर,अनंत आणि जास्वंद..
झेंडुचा सोनसळीला गोडसर गंध..
माझा अंगणी मदं सुगंध दरवळले..
जणू बागेत कोणी अत्तर शिंपडले..
फुलपाखरांची फुलांवर वारी..
आपुलकीचा रंगात रंगली सारी..
मृदुला कांबळे
गोरेगाव -रायगड
=====
0
4
8
2
9
0



