
0
4
8
2
9
3
श्वासाची किंमत
देह-मनाला जोडणारा सेतू
श्वास हा बहुमोल रे…
जगी ज्याचा नाही मोल
त्या श्वासाची किंमत तोल रे…
जोवर आहे देहात श्वास
तोवर देहाला भाव रे…
ठप्प पडता श्वास हा,
तु- मी कुठला राव रे..?
मग कशाला गर्व देहाचा
कशाला हवा फुका आव रे. ?
नित्य वसू दे मनामध्ये
नम्र- लिनतेचा ठाव रे…
उदारतेने देते निसर्ग
ठेव जराशी जाण रे…
श्वासासाठी चेतनांच्या
उगव हिरवे रान रे…
निसर्गसंवर्धन कर गड्या तू
हेच आजचे पुण्यकाम रे…
निसर्गच या जीवनाचा
खराखुरा मोक्षधाम रे…
वनिता गभणे
आसगाव भंडारा
=============
0
4
8
2
9
3



