Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितागडचिरोलीमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

झुंज

अरविंद उरकुडे, गडचिरोली

0 4 8 2 9 7

झुंज

सावल्या गर्द जाहल्या
उन्हंही कलली जराशी
आयुष्याच्या या वळणी
अंधाराचीच सरशी….

मिणमिणत्या पणतीचा
उजेड पुरेल कुठवरी
जीवनातील वादळांशी
झुंजते एकटी बिचारी

मेघ काळेकुट्ट दाटले
व्यापले मन आकाश
लुप्त होत चालला
उरलासुरला प्रकाश

उजेड दिला जयांना
तेही पुसेना आसवे
स्वार्थात बरबटले सारे
जग किती हे फसवे

तरीही धगधगत जिवंत
आशेचा किरण उरात
पणतीचा सूर्य करुन
करेन अंधारावर मात

अरविंद उरकुडे, गडचिरोली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे