लपलेला सूर्य; वेळीच धोका ओळखावा: वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण

लपलेला सूर्य; वेळीच धोका ओळखावा: वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
“नेमेची येतो मग पावसाळा,
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा”
अशी एक उक्ती आहे. निसर्गात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू पूर्वी ठरलेल्या वेळी यायचे. पण गेल्या काही वर्षात यात फार बदल झाला आहे.सूर्य म्हणजे उष्णतेचा, प्रकाशाचा, आणि जीवनाचा मुख्य स्रोत. विशेषत: भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात उन्हाळा हा ऋतू सूर्याच्या तीव्र प्रकाशामुळे अधिक जाणवतो. पण उन्हाळ्यात जर सूर्य सतत ढगाआड लपलेला असेल, तर काय होईल?सूर्य लपल्याने थेट सूर्यप्रकाश कमी होतो. त्यामुळे हवामानात गारवा जाणवतो. हा गारवा सुखकारक वाटला, तरी त्याचे काही दुष्परिणामही संभवतात. सूर्यप्रकाश झाडांसाठी अत्यावश्यक असतो. कारण त्यावरच प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया अवलंबून असते. सूर्य ढगाआड गेला की झाडांचं अन्न तयार करणं थांबतं, फुलं कमी लागतात, आणि फळं योग्य प्रकारे पिकत नाहीत. परिणामी पीक उत्पादनावर मोठा परिणाम होतो.
सूर्य हा निसर्गाच्या वेळापत्रकाचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या अनुपस्थितीत पशुपक्षी आणि किटकांची दिनचर्या बदलते. मधमाश्या, फुलपाखरं यांसारखे परागी करण करणारे जीव कमी हालचाल करतात, ज्याचा परिणाम पीक उत्पादनावर होतो. कार्बन डायऑक्साइड व हरितगृहवायू (Greenhouse gases) निर्माण होतात. हवामानातील अस्थिरता ही मानवनिर्मित कारणांमुळे होत असल्याने, आपल्यालाच पर्यावरण संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. प्रदूषण नियंत्रणासाठी पुढील उपाय करता येतील..इंधनाची बचत करणे ओला व सुका कचरा वेगळा टाकणे,प्लास्टिक जाळणे टाळणे, झाडे लावणे आणि जपणे, जंगलतोड थांबवणे.
प्रदूषण फक्त आरोग्याचाच नाही तर हवामानाचाही शत्रू आहे. सूर्य लपतोय, ऋतू वेगळे वाटायला लागलेत — हे सगळे निसर्गाने दिलेले धोक्याचे इशारे आहेत. हे ओळखून आपण वेळेत शहाणपणाने वागलो, तर हवामान स्थिर ठेवून शेती, पर्यावरण आणि आपले आयुष्य सुदृढ ठेवू शकतो. आजच्या काव्यत्रिवेणी स्पर्धेसाठी आपल्या आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘लपलेला सूर्य’ हा चिंतनशील विषय आहे. शिलेदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पण त्रिवेणी काव्य लिहिताना नियमांचे पालन काटेकोरपणे व्हावे ही आपेक्षा.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह





