🎙️’चला…. कवितेवर बोलू काही’
साहित्य संवाद व कवी संमेलनाचे आयोजन
🎙️’चला…. कवितेवर बोलू काही’
साहित्य संवाद व कवी संमेलनाचे आयोजन
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून उपक्रमाची बांधणी
वैदर्भीय कवी कवयित्रींनी सहभागी होण्याचे आवाहन
शहर प्रतिनिधी, नागपूर
नागपूर: (दि २१): “मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था”,नागपूर तर्फे ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून दि १ मार्च २०२५ शनिवार रोजी सायं. ५.३० ते ९.०० पर्यंत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह’, ऊरवेला कॉलनी, वर्धा रोड नागपूर येथे निवडक लेखक, कवी व कवयित्री यांच्या प्रकाशित पुस्तकांवर निवडक सारस्वतांचा ‘साहित्य संवाद’ व निमंत्रितांचे ‘कवी संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी वैदर्भीय कवी लेखक कवयित्री मराठी काव्यरसिक मराठी वाचक बालक पालक व ज्येष्ठ नागरिक यांनी मुख्य संपादक राहुल पाटील 7385363088, 9834739798, मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 व मुख्य आयोजक ज्येष्ठ कवयित्री सविता धमगाये 98601 40853 यांच्याशी संपर्क साधावा.
📕साहित्यिकांचे मनोगत व कवी कवयित्री यांच्या काव्यवाचनाचे व्हिडीओ मराठीचे शिलेदार संस्थेच्या ‘बिनधास्त न्यूज’ पोर्टल व युट्युब चैनलवर प्रसारित करण्यात येईल. सर्व सहभागी शब्दप्रभूंना सहभाग सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यात आपणा सर्व मराठी काव्यरसिकांचे योगदान हे अमूल्य असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव पल्लवी पाटील यांनी केले आहे.
इतर माहितीसाठी आपण सर्व सारस्वतांनी खालील लिंकद्वारे समूहात सहभागी व्हावे.👇
https://chat.whatsapp.com/LhlLNU7ESFB45tcPTk32sG
©मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्था,नागपूर





