Breaking
कवितानांदेडमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

बा विठ्ठला

बळवंत शेषेराव डावकरे मुखेड जिल्हा नांदेड

0 4 8 2 9 4

बा विठ्ठला

मालक या जगाचा
ठेऊन कर कटेवरी
जगी ठेवितो ध्यान
उभा सदा विटेवरी

पोशिंदा भक्त निस्सीम
चुकत कधी नाही वारी
लागता आषाढी चाहूल
पायी दिंडीचा वारकरी

अठराविश्वे जरी दारिद्रय
नसे फिकीर कुठे मनात
हरीनामाचा ओठी गजर
मुर्ती सावळी मज ध्यानात

विठ्ठला भोळाभाबडा
बडव्यानी तुज कसे घेरले
चराचरात वास्तव्य असता
आमच्यापासून कसे चोरले

विनंती तुज बा विठ्ठला
थांबव परवड जीवनाची
चुकला जरी प्रसंगी कुणी
ठेवजो नजर सदा ममतेची

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
==============

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे