Breaking
ई-पेपरकवितादादरा नगर हवेलीनागपूरसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील काव्यरचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 0 9 0 3

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सोळा🎗🎗🎗*

*🥀विषय : समजून घेतांना🥀*
*🍂बुधवार : २४/ जुलै/२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*समजून घेताना*

समजून घेताना सर्वांना,
नसावा मनात भेदभाव,
तेव्हा सुखी होईल जीवन
हाच आमचा खरा अनुभव.

बघावं ठेऊन स्वत:ला,
गरीब-लाचारांच्या ठिकाणी,
तेव्हा कळेल खरी गरिबी,
जेव्हा पडेल अंगवळणी.

माणूस आहेस, तू माणूस,
माणूसपण जपशील का?
समजून घेताना जीवांना,
प्रेम त्यांना देशील का?

समजून घेताना स्वातंत्र्य,
ते कशाला म्हणावे?
पारितंत्र्यात जगणं तुला
सोडणं भागच असावे.

सुख देणं शक्य नसेल,
दुःख तरी नको देऊ.
समजून घेताना सर्वांना,
मतभेद नको ना करू.

*डॉ. बालाजी राजूरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेतांना*

माझं सारंच जगावेगळं, आणि आहे खास..
ऊन असो वा पाऊस, हसू चोवीस तास..

रंग असो कोणताही,मिसळून जाते त्यात..
सोडून दुनियादारी, घेते झेप अवकाशात..

दरारा असाच माझा,श्वासावरही हुकमत..
बसत नाही रडत, उगाच दुःख चघळत..

मूड माझा असला की,आसूसतात अधर..
त्यांचं काही खरं नाही,नुसता बाबा कहर..

झाडं पानं फूलं वेली,प्रेमात माझ्या पडती..
म्हणे स्वर्गातून आली,अप्सरा लावण्यवती..

बुलंद आवाज मी, सागराची गाजही मी..
चंद्राला भुलवणारी, पुणवेचा साजही मी..

तशी समजून घेतांना,सिंधूताई सपकाळ..
पारा चढला की मात्र, बनतेय कर्दनकाळ..

नको जगाचा हिशोब, चालूच पाणी अन् वाफ..
पर्वा कुणाची कशाला, कोण फुल्ल कोण हाफ्..

*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेतांना*

समजून घेतांना,.कसे कळत नाही।
अरे तेलाशिवाय ,ज्योत जळत नाही।।

काही ऐकल्यावर,सत्य काय शोधावे।
वारा नसला तर, पाने हलत नाही।।

बाह्यांगी पाहूनी, का पडला प्रेमात ।
सुंदरता देहाची, नित्य टिकत नाही।।

माणूस माणसाला,बैमान झाला आहे।
मानवता अजूनी ,अंगी बसत नाही।।

घेत जावे घेताना ,एवढे ध्यानी ठेवा।
देणारे.हात कोणी ,भुलू शकत नाही।।

शेतात रोज रोज,घाम गाळतो तरी।
पिकाला भाव कधी,हमी मिळत नाही।।

चेतना जाणीवही,असावी माणसात।
भ्रमात राहणारे,मुळी जगत नाही।।

*गोवर्धन तेलंग, पांढरकवडा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेतांना*

पाहिले आम्ही,
‘ तारे जमीन पर’
नि ‘ थ्री इडीयट’..
मनोरंजन घेऊन
विसरूनही गेलो थेट..
कळलाच आम्हाला
त्यातील खरा सार..
समजून घेतांना
आम्ही इथेच खाल्ला मार..
बुद्धी त्यांची, त्यांचेच डोळे..
मात्र त्यात कोंबले आम्ही
आमच्या स्वप्नंनाचे गोळे..
त्याला झेपेल? की नाही?
नाहीच केला विचार..
शर्यतीचे घोडे समजून
लादला अपेक्षाभार..
जाणून घेतल्या नाही
त्याच्या आवडीनिवडी..
खरी समजत गेलो नेहमी,
आपलीच बाजू तेवढी..
नैराश्य त्या मनात
जेव्हा केव्हा रडे..
आमच्यातील संवेदनशीलता
नाहीच आली पुढे..!!
प्रतिष्ठेच्या लोभात आम्ही
एवढे का झालो दगड?
पोटच्या पोराचाच नैराश्यात
लटकावा फासावर धड..!!
लटकावा फासावर धड..!!

*सौ वनिता गभणे आसगाव भंडाराश्च
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*समजून घेताना…*

समजून घेताना माणूस
अवघडचं प्राणी भासतो
बोलून कधी अबोल्यात
का तो संभ्रमात टाकतो..

चेहऱ्यावर चढवून मुखवटा
दुःख लपवून हसत राहतो
खोटा प्रयत्न करता करता
शेवटी एकदा लपू पाहतो..

समजून घेताना समोरच्याला
भावनिकरित्या गुंतत जातो
मनात आपुलकीचा पाऊस
ओंजळीतल्या तळव्यात न्हातो..

समजून घेणारा समजून घेताना
विश्वासाची मिठी मारतो
कितीक शब्द फुलांनीं
समजूतीच्या चौकशा करतो..

समजून घेणारा असावा एक तरी
नशीबवान तोच जगात एकमेव
पाठीशी सतत उभा सदाकाळ
जीवनात तोच एक अवश्यमेव…

*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव-रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेताना*

माझ्यासाठी श्रावण होऊन
बरसशी रिमझिम रिमझिम
कधी आषाढी कोसळताना
भिजवीसी माझे रोमरोम

वळिवाचे रुप घेऊनी
भेटसी मजला असोशीने
कुशीत तुझ्या गवसते रे
लावण्यमयी रुप देखणे

मृग सरला, सरे श्रावण
अता कशाचे बहरून येणे
भूमी नभास बोले सखया
भेट आपुली अता न होणे

समजून घेताना तुज सख्या
किती आवरू या मनाला
तुझ्या आठवांची नव्हाळी
विरह व्यथेने जाळी मजला

तुझ्या भेटीची ओढ मलाही
समजून घे भूमी वेल्हाळे
कवेत घेता तुला साजणी
टिपूर चांदणे किती गंधाळे

होते क्षितीज शलाकेवरी
भेट आपुली रोज नव्याने
सामावसी मिठीत अवघ्या
मम सहस्त्र बाहूंत आवेगाने

युगायुगांचे आपुले नाते
नकळे अजूनी का भावार्थ?
सख्या तुझ्या सावलीतची
अस्तिवाला माझ्याही अर्थ

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेतांना*

गैरसमज,विवाद होतातच कसे
एकमेकांस समजून घेतांना..
अहंकार तो पाहिजेच कशाला
मनी प्रेम भावना जपताना..

शब्द निघतात वेगळेच मुखातून
डोळे दिसतात वेगळंच सांगताना..
शोक होतो अनावर मनाचा
तुला एकटी सोडून जाताना..

रूसवे,फुगवे, बाचाबाची होतेच
संसार गाडा हाकताना..
पण वाटते वाईट दोघांचे गुपित
जेंव्हा दिसते उंबरठ्या बाहेर जाताना…

नात्यांचे हे रेशीम बंध
वाटते मीच पाहिजे जपायला..
ये परतून ये सखे लवकर
नात्यात नको गं गाठ पडायला…

ऐकून घेईन तुझ्या साऱ्या तक्रारी
तु रहा सोबत मी काटेरी वाट चालताना..
दु:ख सावरू हळूहळू पुन्हा
आनंदाश्रूनी चिंब भिजताना…

भूतकाळ जाऊ दे गं मागे
बघू प्रेम किरण क्षितीजावर चढताना.
संसार हा अवघड प्रश्न मित्रांनो
सुटतो फक्त… समजून घेतांना..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेताना*

सहवास हा तुझा
रोजचाच सोबत
सुख दुःख वाटतं
जाई दिवस हर्षात

आवाज ओळखून
विचारतो मला तू
आज उदास वाटते
कारण सांग ना तू

भिजवतो मन माझे
आपुलकी व प्रेमाने
तू असावा सोबतीस
वाटे मज आनंदाने

हृदयस्थानी माझ्या
सदोदित विराजते
समजून घेताना रे
मन माझे सुखावते

वाटते सदा मलाही
तुझी साथ असावी
मनाच्या स्पंदनात
सदैव फुलत राहावी

*सौ माधुरी काळे*
*वणी जिल्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेताना*

समजून घेताना तयाला
न्यूनता ना उरली कुठे
प्रेमाचा रेशीमधागा उसवला
पण स्नेहबंधन ना तुटे

हवाहवासा वाटणारा
त्याचा तो प्रेमळ सहवास
गोडी प्रेमाची, हृदय स्पंदनाची
मनी ध्यानी फक्त त्याचाच भास

प्रेम रंगात त्याच्या अशी
ती खोलवर बुडाली
अति काळजी नसे चांगली
चूक तिला पुरती कळाली

आता प्रश्न एकच उरला
एकमेकांना बहरण्याचा विश्वास द्यायचा का
उद्ध्वस्त होतानाही सहनशील राहू असा
दिलासा द्यायचा

*सौ स्नेहल संजय काळे*
*फलटण सातारा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेताना*

समजून घेताना प्रत्येकाला
आई सदा असते शांत
हव नको ते सर्व बघताना
नियोजन असते तिचे पर्याप्त

अभ्यास तिला असतो
प्रत्येकाच्या स्वभावाचा
दुवा साधते प्रत्येकाशी
भाव ठेवून प्रेमळपणाचा

मुलांचे जेवण,अभ्यास
यात ठेवते ताळमेळ
घरातील ज्येष्ठ,वृद्धांच्या
शुश्रुषेची ठरलेली वेळ

घराला आहे घरपण
लाखमोलाचे तिचे अस्तित्व
परोपकारी भाव तिचा
कार्यामध्ये दिसते सत्व

शेजारधर्म,सामाजिक कर्तव्य
निभावण्या असते अग्रेसर
प्रेमभाव,दया माया
सत्वगुणांची ती धरोहर

समजशक्ती तिची अगाध
कलहाला न थारा असे
तिच्यामुळे घर मंदिर
दुर्गा रूप तिच्यात वसे

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेतांना*

समजून घेतांना त्याला
घ्यावे त्याला जानून
मनाला पटल्यावर आपल्या
करावे विचार हृदयातून

समजून घेतांना बळीला
थोडी दाखवावी दया
विश्वास बसला त्यावर
लावून घ्यावी आपली माया

चेहर्यावर चे भाव,,,,
लगेच येतात दिसून
हा दिखावा आहे की काय
घ्यावे थोडा पडताळून

माणसाची समजदारी हीच
शिकवित असते माणुसकी
थोडा फार करून सत्करम
दाखवता येतो आपुलकी

बळीराजा पालनहार सर्वांचा
द्यावे त्याला जिवनाचा आधार
कष्टातच जगत असतो जिवन
वाहत असतो कर्जाचा भार

हीच वेळ येतो सर्वांवर
बाळगू नये उगीच अहंकार
सहानुभूतीने वागावे सर्वांशी
सुखी समृध्दी करा संसार

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेतांना*

समजून घेतांना स्वतःला
खूप जिम्मेदारीने वागलो,
असेल कमी काही स्वतः
कर्तव्याला सदा जागलो…

होती आपली परिस्थिती
त्यानुसार तडजोड केली,
भूमिका आपली परिपूर्ण
यशस्वीपणे पार पाडली…

ओझे आपल्या अपेक्षांचे
लेकरांच्या माथी मारले,
डोईजड सांभाळले त्याने
फार उशिराने सांगितले…

मुलांना समजून घेतांना
घ्याव्यात जाणून अपेक्षा,
पुढे चलून नको व्हायला
त्याच्या मनीच्या निराशा…

गोंधळ मनातल्या मनात
जातात मुलं मग खचून,
धीर देत समजुन घेतांना
यश ही आणतात खेचून…

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेतांना*

सोसते तप्त विरह वेदना, तुला समजून घेतांना
खात्री आहे घेवून येशील, तृप्तीचे दान येताना..

कणा कणाने झुरतेय, एकेक क्षण मोजताना
तीळ तीळ तुटतेय मन, ग्रीष्म दाह भोगताना..

किती जाचते प्रतिक्षा, क्षितिजावर रेंगाळताना
कसे पाहू शकतोस तू, मला अशी भेगाळताना..

दिसेना तो वादळी वारा,तुझा संदेश आणताना
व्यथित झाला नाहीस का, दुःख हे जाणताना..

अजून का शांत तू, मी विरहाग्नीत होरपळताना
संकेत तरी दे कांही, जाणवू दे तू विरघळताना..

दौडत ये गर्जत ये, अंत पाहू नको रे तरसताना
वादळी आवेग वळवाचा, अनुभवू दे बरसताना..

बघू दे जग मेघमाया, मला चिंब कुरवाळताना
शहारू दे ओली काया, कस्तुरगंध दरवळताना..

मृगमाया पांघरशील, माझ्यात हळू रूजताना
धन्य होईल धरणीदेह, पाहता तुला उगताना..

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेताना*

होतो मी लेक लाडाचा
तुकडा काळजाचा
मी भाऊ होतो बहिणीचा
समजून घेताना स्वतःला
जीव मेटाकुटीस आला
का? आवडते भातुकली मजला
का ? शरीर आकार घेतो..
कशी.. चमत्कारिक लवचिकता आली शरीराला…
वाटे बंद दारी साज शृंगार करावा
घालावे कुंडल, पैजन ,बांगड्या…
पण मी तर मुलगा ना…!
संघर्ष चालला जीवघेणा
दाबलेल्या भावनांची खळबळ अशी
जणू घुसळन समुद्रमंथनाची
अवस्था जशी जलचरांची
तशीच त्रेधा तिरपीट मनाची
*समजून घेताना स्वतःला*
उद्रेक भावनांचा झाला
भयावह वास्तवाचा पडदा
अक्षरशा फाटून गेला..
सत्य कळले .. मी..’तो’ नाही
अन ‘ती’ पण….
आज एका किन्नराचा जन्म झाला… समजून घेतले मी स्वतःला.. समजून घेतो आता कायमच …समाजाला..

*सौ सुरेखा कोरे,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेतांना : -*

तुझ समजून घेतांना
थोडस अवघड गेल
मनाशी सांगड बांधुन
नात मिळतजुळत केल….

समजदारीचे गुण तिचेपाशी
जोडून घराला केल एकरूप
समजुन समायोजन साधल
घरपण आल आनंदाच स्वरूप…

मनासारखा पटला मुद्दा
हुशारच आहे ती ऊमदा
टोकाची भूमिका घेत नाही
अनुभवले वर्तन बरेचदा…

ओय आत्याबाई सासुबाई
सुनेला समजून घेतांना
मागेपुढे कशाला पाहते ?
तिजोरीच्या चाब्या देतांना…

ठीक नेकीने ओढते कारभार
सोपवा जबाबदारी खांद्यावर
खात्रीपूर्वक सांगतो दांडगा धनी
विश्वासाने सुरळीत होय संसार…

*प.सु.किन्हेकर,वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️
*समजून घेतांना*

समजून घेतांना
स्व: बाजूला ठेवा।
कुणाला समजतांना
थोडा वेळ द्यावा।।१।।

स्वत:च्या अपेक्षांना
आवर घालावा।
कुणाला समजून घेतांना
थोडा जीव लावावा।।२।।

समजून घेतांना आपल्यातही
खोल डोकावून पहावे।
कधी कधी दुसर्याचेही
मन थोडं वाचून बघावे।।३।

समजून घेतांना जीवनात
तडजोड करावी ।
जगतांना संकटांनाही
आता शरम वाटावी।४।

समजून घेतांना आयुष्यात
दु:खे पळत जातील।
त्यापाठोपाठ जीवनात
सुखे चालत येतील।।५।।

*श्री गणेश नरोत्तम पाटील(स्नेहवलकार)*
*ता.शहादा जि.नंदुरबार*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔰🎈🔰♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे