टाटा उद्योग व्यवसायातील विश्वासार्हतेचा मानबिंदू, आधारवड हरपला.
तारका रूखमोडे प्रतिनिधी
टाटा उद्योग व्यवसायातील विश्वासार्हतेचा मानबिंदू, आधारवड हरपला.
प्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषणण समाजसेवक रतन टाटा कालवश
एक दिवसाचा दुखवटा जाहीर..
तारका रूखमोडे, प्रतिनिधी
मुंबई: टाटा समूहाचे प्रसिद्ध मानद अध्यक्ष विश्वस्त रतन टाटा आज रात्री बारा वाजताच्या सुमारास मुंबईच्या ब्रीच कैंडी हाॅस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने त्यांनी प्राणज्योत मालवली. त्यांनी सामाजिक जाणीवेतून आजन्म लोकांना मुक्त कराने मदत केलेली आहे. टाटा मोटर्स द्वारे स्वदेशी कार बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे .सर्वसामान्य लोकांसाठी अगदी स्वस्त दरातील नॅनो कारची सुद्धा निर्मिती केलेली आहे.व्यवसाय करताना समाजाचा विसर पडू नये या मताचे ते होते. १९९० ते २०१२ या काळात ते टाटा सन्सचे अध्यक्ष होते. व २०१६पासून ते टाटा चॅरिटेबल ट्रस्टचे ते नेतृत्व करत होते. जमशेदजी टाटा यांचे पणतू असले तरी, उद्योग क्षेत्रात त्यांनी स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवला.
याही पलीकडे म्हणजे ते दूरदर्शी, श्रीमंत मानवतावादी दृष्टीकोन असलेले व्यक्तीमत्व,नैतिकतेचं मूर्तीमंत आदर्श होते. संपूर्ण जगात त्यांनी भारताची मान उंचावलेली आहे. असे परोपकारी व्यक्तीमत्वाचे धनी, भारतीय अर्थव्यवस्थेचा एक मजबूत हात, संवेदनशील तथा कष्टाळू कोहिनूर रत्न ( रतन) आज आपल्यातून निघून गेले आहेत. आज शासकीय इतमानात नरिमन पाॅईंट ते वरळी पर्यंत त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे, व ४ वाजता वरळी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.
त्यांच्या सन्मानार्थ शासकीय इमारतीवरचे ध्वज आज अर्ध्यावर उतरवले जाणार आहेत, व महाराष्ट्र तथा झारखंड येथे एक दिवसाचा शोक घोषित करून राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. त्यांचा अविरत कष्टाळूपणा व व्यापक निस्वार्थ मानवतावादी दृष्टीकोन युवकांना सदैव प्रेरणा देत राहील. अशा या महान मानवतावादी देवांश उद्योगमहर्षीस ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हीच ‘मराठीचे शिलेदार’ समूहातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..!