Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आवासचे सुयश

तुषार थळे, प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आवासचे सुयश

तुषार थळे, प्रतिनिधी

अलिबाग: सोमवार दि. ७ अॉक्टोबर व मंगळवार दि. ८ अॉक्टोबर २०२४ रोजी कारमेल हायस्कूल, खोपोली येथे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत आवास, सासवने, धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासच्या पुढील विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक खेळ करून घवघवीत यश संपादन केले.

*१४ वर्षे वयोगट मुलगे-*
१) पवन मांझी, इ.८ वी [ ३८ कि.ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
२) मयूर कोकळे, इ.८ वी [ ४१ कि.ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
३) श्रवण भगत, इ. ९ वी [ ५७ कि. ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
४) तनिष पाटील, इ.७ वी [ ५२ कि.ग्रॕ. ] *द्वितीय क्रमांक*

*१७ वर्षे वयोगट मुलगे (फ्री स्टाइल कुस्ती)*
१) नाविण्य वर्तक, इ. ११ वी [ ५५ कि.ग्रॕ. ] *द्वितीय क्रमांक*

*१७ वर्षे वयोगट मुलगे (ग्रीको रोमन कुस्ती)*
१) अनिल पिंगळा, इ. १० वी [ ४८ कि.ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
२) वरद सांगले, इ. ९ वी [ ५५कि. ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
३) दुर्वेश पाटील, इ. ९ वी [ ६० कि. ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
४) अधिराज व्हडगीर, इ. १० वी [ ६५ कि. ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
५) संकल्प भगत, इ. १० वी [ ९२ कि.ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
६) ऋत्विक शिळदणकर, इ. ९ वी [ ४५ कि. ग्रॕ. ] *द्वितीय क्रमांक*

*१९ वर्षे वयोगट मुलगे (फ्रीस्टाइल कुस्ती)*
१) स्वप्नील हंबीर, इ. ११ वी [ ५७ कि,ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
२) ओम धोंडसेकर, इ. १२ वी [ ९२ कि. ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*

*१९वर्षे वयोगट मुलगे (ग्रीको रोमन कुस्ती)*
१) प्रमोद वरक, इ. १२ वी [ ६० कि.ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*

*१४ वर्षे वयोगट मुली-*
१) समीक्षा पाटील, इ. ८ वी [ ३९ कि. ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
२) मनिषा थापा, इ. ८ वी [ ४२ कि. ग्रॕ. ] *प्रथम क्रमांक*
३) लक्ष्मी थापा, इ. ९ वी [ ४६ कि. ग्रॕ. ] *द्वितीय क्रमांक*
४) मीरा पाटील, इ. ७ वी [ ३६ कि.ग्रॕ. ] *द्वितीय क्रमांक*

वरील सर्व प्रथम क्रमांक संपादन करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांची पोलिस परेड मैदान, कळंबोली येथे होणाऱ्या विभाग स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ह्या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी माजी मुख्याध्यापक / माजी प्राचार्य प्रमोद भगत सर व विद्यमान क्रीडा शिक्षिका प्रियंका राणे मॕडम यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आ. सा. धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व सभासद, तसेच मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे