0
4
8
2
9
0
नवलाई
उदय आणि अस्त हे
कालचक्र दिनकराचे
हास्यानंतर येती अश्रू
फलित मिळते कर्माचे
नऊ दिवस नव्याचे
असतो सृष्टीचा नियम
नसे न येथे अमर कोणी
अमरत्व नसते कायम
वशिल्यांनी होतो गुणवान
यात कोणती ती नवलाई
स्वकष्टावर यश मिळवतो
हीच खरी असे अपुर्वाई
चार दिसांचा हा बाजार
मिळव मानवा तू पुण्याई
आला जरी काळ सामोरा
नको सोडूस ती सच्चाई
अनपेक्षित घडू दे अपेक्षित
सत्यमार्गाने करावी भरपाई
पाड भागअचंबित व्हायला
ही तुझ्या वर्तनाची नवलाई
श्री बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
0
4
8
2
9
0



