शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*
*☄विषय : महाराज पुन्हा येऊ नका☄*
*🍂शनिवार : २१/ ०२ /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*खालील विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २०६ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*महाराज पुन्हा येऊ नका*
महाराज, पुन्हा येऊ नका…
अस्वस्थ व्हाल तुम्ही…
जेव्हा पाहाल आमचे दुःसाहस…
आणि हताशपणे उद्गाराल…
यासाठीच केला होता का अट्टाहास..?
महाराज…
तुम्ही परस्त्रीलाही दिला…
मातेचा मान सन्मान..
आणि आंम्ही मात्र…
माय भगिनींचेच तोडतोय लचके…
आणि मायबाप वृद्धाश्रमात..
तुमच्या राज्यात…
भाजीचा देठही सुरक्षित होता..
आणि आजचा शेतकरी..
कर्जात त्रस्त, आत्महत्या ग्रस्त…
तुम्ही अधर्मी. अत्याचार्यांचा..
भरचौकात चौरंग केलात..
दुष्टांना धडकी भरवणारे सुशासन दिलात..
आणि आंम्ही मात्र…
बनतोय दुर्योधन दुशासन…
गांजवतोय रोज कित्येक द्रौपदींना..
तुम्ही केलात स्वच्छ राजनिती..
आंम्ही करतोय…
गलिच्छ षडयंत्री कुटनिती…
नितिमत्तेला कधीच दिलीय मूठमाती..
राज्यकर्ते बनून…
करून घेतोय स्वपिढ्यांचा उद्धार..
भ्रष्टाचार, स्वैराचारात..
नखशिखांत डुबलोय आंम्ही..
आणि हो..
भगव्याच्या अस्मितेचा पुळका..
येतोय आधी मधी…
कपाळी अर्धचंद्राकृती टिळा..
भरदार दाढी…
बेंबीच्या देठापासून ओरडतोय..
जय भवानी जय शिवाजी…
मात्र तुमचे आदर्श विचार..
खुंटिला टांगलेत आंम्ही…
जीवाचे रान करून बांधलात..
अभेद्य गड किल्ले…
आंम्ही फक्त देतोय…
लंबीचौडी भाषणे…
दारू पिऊन बेभानपणे…
नाचतोय डिजेच्या तालावर…
आणि बेदरकारपणे..
उडतोय गाड्या रस्त्यावर..
महाराज….!
पाहू शकाल का हे अधःपतन..?
म्हणूनच म्हणतोय…
महाराज पुन्हा येऊ नका….
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏🚩🙏♾️♾️♾️
*महाराज पुन्हा येऊ नका..!*
अनीतीने माजला संसार।
शिवबा तुच आता आधार।।
द्रुष्टांना वाटते तुझे भय।
सज्जनांचे मात्र तु ह्रदय //१//
नाहीच उरली नीतिमत्ता।
स्वार्थापोटी होत आहे सत्ता।।
तरीही वाहे तुझीच वारे।
तलवारीच्या धाकात सारे//२//
राष्ट्रप्रेम स्वाभिमान नाही।
देशद्रोह्या संविधान नाही।।
रयतेच्या तुम्हीच मनात।
विधातापरी अम्हां जनात//३//
ईथे अत्याचारी भ्रष्टाचारी।
गुंजे तुमचीच ललकारी।।
स्त्री सन्मान,भुलले लाज।
विषमतेनी वाटला समाज//४//
धर्मांधतेनी घेतात झोके।
मानवतेला पडली भोके।।
द्रुष्टांची ही हाक ऐकू नका।
म्हणे, महाराजा पुन्हा येऊ नका//५//
माय जिजाऊ घे जन्म पुन्हा।
शिवबामुळे , ना घडेल गुन्हा।।
फुले भीम नांदेल व्यवस्था।
शाहूमुळे जाईल दुरावस्था//६//
*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा. जि यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏🚩🙏♾️♾️♾️♾️
*महाराज पुन्हा येऊ नका..!*
महाराज, पुन्हा येऊ नका
आता आम्हीच घेऊ हाती तलवार
तुमची स्वप्नं, तुमची मूल्यं,
प्रत्येकाच्या मनात रुजविणार
धैर्य, न्याय, सत्याच्या मार्गाने
तुम्ही शिकवला स्वाभिमान,
आता तोच वसा घेऊनी
राष्ट्राची राखू आम्ही शान
तुम्ही घडवला इतिहास,
आम्ही घडवू वर्तमान,
घेऊन तुमची आदर्शनीती
होऊ आम्ही सज्ज सामर्थ्यवान
रक्ताच पाणी केलं तुम्ही
स्वराज्य निर्माण करण्यासाठी
जाणीव तुमच्या संघर्षाची
प्रेरणा देई लढण्यासाठी
आमच्या प्रत्येक श्वासात
तुमचे विचार आहे जिवंत
ठेवा आमच्यावर विश्वास
स्वप्नांचा होऊ देणार नाही अंत
*कुशल गो डरंगे, अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🙏🚩🙏♾️♾️♾️♾️
*महाराज पुन्हा येऊ नका…!*
महाराज पुन्हा येऊ नका कारण
आता बदलली स्वराज्याची परिभाषा..
जरा प्रेमात दगाफटका झाला तरी
मावळ्यांच्या मुखी मरणाची भाषा..
सत्तेसाठी चाललाय घोडेबाजार
अन् खुर्ची खालून पैश्यांचा व्यवहार..
गरीबांना नाही इथे कोणाचाही आधार
योजनांचा चाले फक्त कागदी कारभार…
परकीय शत्रू पेक्षा ही झाले घातकच
आज आपल्याच घरातले घरभेदी..
एकाचा झेंडा हाती,दुसऱ्याची करी चाकरी
स्वार्थात बरबटलेले जीव पैश्यांचे कैदी..
पुन्हा येऊ नका महाराज दुःखी व्हाल
गड, किल्लांची पाहून अशी दुरावस्था..
काळजात पडेल हो पीळ वेदनांचा
पाहून आजची ही समाजव्यवस्था..
पण यायचंच असेल पुन्हा तरी यावे
नवयुगातील नवतरूणाच्या रूपाने..
मग नवयंत्र,राजतंत्र,अन् समाजतंत्र
सारे आत्मसात कराल नवचैतन्याने…
*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🙏🚩🙏♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*महाराज पुन्हा येऊ नका…!*
राजं पुन्हा जन्माला या म्हणून
गगनभेदी ललकारी घुमते
डीजेच्या कर्णकर्कश तालावर
आजची बेधुंद तरुणाई थिरकते
रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या
माताभगिनींची छेड काढली जाते
स्वतःला शिवभक्त म्हणणाऱ्यांच्या
विचारांची गती षंढ का होते
शेतकरी कष्टकरी बळीराजा
आज देशोधडीला लागतोय
पाषाणह्रदयी मायबाप सरकार
कर्जमाफीचे मृगजळ दाखवतोय
पूर्वी फितूर शोधावा लागायचा
आता मात्र गल्लोगल्ली पडलेत
स्वार्थापायी लाचारी पत्करणाऱ्या
नामर्दांचे जणू मेंदू सडलेत
महाराज पुन्हा येऊ नका….
म्हणायला मन धजावत नाही
पण स्वराज्यात मातलेला स्वैराचार
तुमच्या मनाला पटणार नाही….
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏🚩🙏♾️♾️♾️♾️
*महाराज पुन्हा येऊ नका*
महाराज पुन्हा
येऊ नका
झाली बजबजपुरी
बसेल धसका ॥१॥
स्वार्थाने पेटले
सारे जग
नाही आपले
राहीले मग ॥२॥
पाण्याची टंचाई
वातावरण गढूळ
कामाला दिरंगाई
नाही पाठबळ॥३॥
कष्टाची कमाई
ना,खताला गांडूळ
नाही दिलजमाई
नुसती बांडगुळ ॥४॥
हक्काचे शेत
कर्जाचा बोजा
करावी कशी मात
पैसा ना मोजा ॥५॥
सांगावे गाऱ्हाणे
कुणाला आता
दिसते देखणे
नुसत्या बाता॥६॥
मोबाईलची चलती
करती गलती
स्वतःला विकती
दुसऱ्याची माप मोजती ॥७॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏🚩🙏♾️♾️♾️♾️
*महाराज पुन्हा येऊ नका..!*
विटी-दांडू सोडून तुम्ही
तलवार घेतली हाती
भेदून मुघल गनिमांना
स्वराज्याची दिली माती
त्याच मातीवरती आज
फोफावतेयं हुकूमशाही
खुर्चीचे गेचूळ नेते आज
प्रामाणिक ना पक्षातही
पर स्त्री मातेसमान
या विचारी तुम्ही रुजले
आज रक्ताचे नातेही
वासनेत जाते पुजले
अठरापगड जाती जोडून
तुम्ही उभारले सुराज्य
जातीजातीत धर्माधर्मात
माणूस आजही विभाज्य
मातेच्या स्वप्नासाठी तुम्ही
देह झिजवला अहोरात
वृद्धाश्रमी बंद झाले
आज माय लेकाचं नातं
रयतेच्या सुखासाठी तुम्ही
वेचले सारे सारे आयुष्य
स्वार्थाच्या मोहसागराचा
जो- तो झाला आज मत्स्य
कायद नि सुव्यवस्थेत होती
चोख तुमची राज्यघडी
धनकोच्याच खिशात बसला
न्याय आज मारूनी दडी
बघवणार नाही राजे तुम्हा
इथला अनागोंदीचा ठेका..
म्हणून सांगते मी वनिता
महाराज पुन्हा येऊ नका..!
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏🚩🙏♾️♾️♾️♾️
*महाराज पुन्हा येऊ नका*
राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्या ना
विनवणी करतील जयंती दिनी
ढासळली आहे नीतिमत्ता अन्
दयनीय अवस्था केविलवाणी
पाहवले जाणार नाही कदापी
तुमच्याने आमची ही राजनीती
स्वार्थ साधून ते घर भरताहेत
राहिली नाही कसलीच भीती
तुम्ही आठरापगड जातीधर्माचे
मावळे घेऊन स्वराज्य स्थापीले
जातीपाती धर्माधर्मात आम्ही
आमचे मत विभाजन हो केले
अमानुष्य अन्याय, अत्याचारा
बळी पडतेय गोरगरीब जनता
अब्रू लुटतात,धिंडवडे काढतात
कायदा सुव्यवस्था न जुमानता
तेढ निर्माण झाले आहे धर्मात
बीज पेरलेले प्रत्येकाच्या मनात
समता, स्वातंत्र्य, न्याय,बंधुता
लोकशाही तत्व येईना ध्यानात
खरंच महाराज पुन्हा येऊ नका
पाहवणार ना तुम्हां राजकारण
तुमची शिकवणूक काय होती
पश्चाताप होईल हो विनाकारण
*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏🚩🙏♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



