वि.स.खांडेकर यांच्या जयंतीला ग्रंथपूजन
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
वि.स.खांडेकर यांच्या जयंतीला ग्रंथपूजन
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे.दि.13 जाने (प्रतिनिधी): कादंबरी युगात मराठीतले श्रेष्ठ लेखक आणि ज्ञानपीठ पुरस्काराने गौरावान्वित वि. स. खांडेकर यांची जयंती ग्रंथाचे पूजन करून अगदी औचित्यपूर्ण पध्दतीने साजरी करण्यात आली. वि. स. खांडेकर स्मारकाच्या साक्षीने हे ग्रंथपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. श्याम भुर्के, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे, डॉ. अनुजा कुलकर्णी व गीता भुर्के यांनी या कार्यक्रमात आपले मनोगत मांडले.
खांडेकरांच्या साहित्याची थोरवी आणि त्यांचे भाषासौंदर्य प्रा. श्याम भुर्के यांनी उलगडून सांगितले. माधुरीताई सहस्रबुद्धे यांनी खांडेकरांच्या साहित्याची मोहिनी आजही मनावर ताजी असून आपण गेली अनेक वर्षे खांडेकरांची स्मृती जागवण्यासाठी साज-या केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी खांडेकरांच्या रूपक कथेची वैशिष्ट्ये विशद केली. कार्यक्रमास रसिक वाचक व साहित्यप्रेमी उपस्थित होते.



