Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 4 8 2 9 0

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*

*☄विषय : संकटसमयी☄*
*🍂शनिवार : २६ / एप्रिल /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*संकटसमयी*

दहशतवाद्यांनी साधला
डाव निष्पाप लोकांवर
धर्मभेदाचे पांघरूणाआड
केले निष्पाप जीवांचे हनन

पहलग्राम मधील स्थळ
बैसरन घाटी अती सुंदर
मनसोक्त आनंद लुटण्या
जमले पर्यटक घाटीवर

अचानक गोळीबाराचा थरार
सगळीकडे धावपळ थैमान
हिंदू लोकांना हेरून गनीमांनी
गोळी घालून केले निष्प्राण

अशा संकटसमयी तिथे
नव्हती सुरक्षा व्यवस्था
गेले निष्पाप जीवांचे बळी
कित्येक कुटुंबाची झाली दशा

पर्यटन स्थळ कुठलेही
हवे सुसज्ज सुरक्षेनी
संकटसमयी पर्यटकांना
आधार असावा क्षणोक्षणी

मानवतेला काळीमा फासणारी
निंदनिय ही काळी घटना
उध्वस्त करून गेली जीवांना
शिक्षा मिळावी कडक तयांना

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿
*संकटसमयी*

आयुष्याचा वळणावरती
तसे येतील बहू आव्हाने,
सामोरे जावे लागते तया
धैर्याने,मोठया शिताफीने…

खचून जायचे नाही कधी
पाहून येणाऱ्या संकटाला,
सामना करायचा जिद्दीने
हमखास यश मिळायला…

संकटसमयी नसेल कोणी
कठीण परिस्थिती सोबती,
विजयश्री मिळवताच मग
बदलून जाईल मन:स्थिती…

संघर्षातून इतिहास घडतो
तावून सुलाखून निघतांना,
रचली जाते यशोगाथा ती
मार्ग प्रेरणादायी ठरतांना…

कठोर मेहनत स्वबळावर
जिद्द उराशी बाळगलेली,
कामी येईल संकटसमयी
दिशा मार्गदर्शक ठरलेली…

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿
*संकटसमयी*

धावतो जो संकटसमयी
तो देवापेक्षा कमी नाही
तो असू शकतो शेजारी
मित्र किंवा वाटसरूही……..

जोतिषी असतील खरे
यावर विश्वास नाही
मग भविष्य सांगणारे
का संकटात पडतात काही….

येता संकट आपल्यावरी
करते जीवन उध्वस्त सारे
काहीना होते आनंद तेव्हा
त्यांचे जीवन सुखी नसेरे…….

काहीना मान्य नाही देव
ते मानती अंधश्रद्धा त्याला
मग का करताना दिसतात
संकटसमयी त्याचा धावा……

जे समजती देव स्वतःला
त्या सारखे पाखंडी नाही
संकटसमयी करते विनवणी
अश्याना करु नये मदत काही….

*डॉ.श्री. बालाजी राजुरकर*
हिंगणघाट जि. वर्धा
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿
*संकटसमयी*

एरवी सुखात लोळे मानव
आठवतो देव संकटसमयी,
घेई धाव,दुःखमुक्तीसाठी
चालतो राऊळी पायी पायी.

पर्वा करेना कोणाची
स्वतःच्याच अविर्भा वात वागतो,
आजूबाजूला न पाहता
स्वतःचाच,दिमाख दाखवितो.

विसरतो तो सदैव
तो हीं, गेला यातून,
स्वप्रतिष्ठा,जपतो
आत्मप्रोढीने वागून.

अहंमपनाचा हैवाण
वसतो त्याच्या रगा रगात,
माझ्यासारखा मीच
मिरवतो चारचौघात.

येतासंकट होई खजिल
गळून पडतो मान सन्मान,
देवाशिवाय येणार कोण?
मदतीला त्याच्या धावून.

*मायादेवी गायकवाड ठोकळ*
*ता मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿
*संकटसमयी*

सारे सुखाचे सोबती, हीच तर जगाची रित
संकटसमयी धाव घेई, असा हवा एक मित..//

संवेदनशील मनाचे, जिथे तिथे द्यावे प्रचित
मौनातली वेदनाही, त्याने जाणावी निश्चित..//

पाठीवरती हात असावा, हार असो की जीत
यशाचे सोहळे व्हावे, अन् अपयशाचेही गीत..//

जीवघेण्या संकटातही, राहता यावे निश्चिंत
जीव देण्या मित्र सज्ज, पर्वा नसावी किंचित..//

हवेत कशाला शेकडो, संकटसमयी निद्रिस्त
इथे एकच बंदा पुरेसा, ज्यावर ठेवावी भिस्त..//

राख झाले स्थावर तरी, मित्र असावा जिवित
अशी भावना ज्याची,त्याच्या असावे संगतित.//

फिनिक्सापरी जिद्द भरे, जो आपल्या छातीत
राखेतूनही झेप घेता, व्हावे कशाला विचलीत.//

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे. राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेची नोंदणी दि ३०/०४/२०२५ पर्यंत करावी*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*संकटसमयी*

आयुष्याच्या प्रवासातील प्रत्येक वाट असते बिकट
परीक्षा पहायला अशा वेळी येत असतात संकट

अशा संकटांना पाहून कधी थांबायचं नसतं
तर खंबीर मनाने त्यांना परतवून लावायचं असतं

मदतीला धावून येईल कोणी आशा नसते बाळगायची
संकटसमयी आपणच व्हायचं असतं आपल्या बळाचं धनी

हल्लीच्या युगात आप्तइष्ट सगे सोयरे फक्त असतात नावाला
तरीही दोष द्यायचा नसतो आपण कुणाला

अशावेळी अंतर्मनाला घालायची असते साद
आणि ऐकायचा असतो फक्त त्याचाच आवाज

कोण काय म्हणेल? याची पर्वा नसते करायची
आपल्याला जे योग्य वाटेल तीच वाट निवडायची

देव आपली परीक्षा पाहतोय याचं भान ठेवून लढायचं असतं
संकटसमयी आपणच आपल्याला जिंकायचं असतं

*सौ. अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿
*संकटसमयी*

नित्य नियमाने आपण
सदाचार चांगले वागावे
अनोळखी रुपांतरण
भक्ती भावात व्हावे….

लागला शब्द बाण खरा
तरसून जाऊ नये कव्हा
दाखवूनी दिशा पंथाचा
फुलं गुलाबी काटे तव्हा..

ओरखडूनी जाये दूरदेशी
पण कोण विचारी तयासी
मोठे मोठे सुरुंग भरुनी
धर्म धरम वेताळी उपासी…

कोण येतो धावून त्यास
राजे रोस कक्ष शहनायी
कर गड्या कार्य महान
मदतीला सारे संकटसमयी…

*शिवाजी नामपल्ले अहमदपूर जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿
*संकटसमयी*

कुणा सांगताय कुणा मांगताय,
स्वत: करत जा स्वतःची सुरक्षा…
जीव गेल्यावर पायाभरणीत,
मिटतील काय मंदावल्या कक्षा ?…१

नसती कुणीच, कुणाचे वाहक,
प्रसंगी चालतो,शब्दांचाच खेळ…
आपुल्या हितास,जपावया नेते,
बसवित जाती,नौटंकीचा मेळ…२

कोण मरतोय कोण तरतोय,
नसते जाणीव,नसते काळजी…
मरणाऱ्यांच्या चितेवर ढाळती,
अश्रूंचा पाट हो, नसतांना मर्जी…३

कोण धावतात,’संकटसमयी’,
कोण पळतात, दूर दूर मार्गी…
‘सुधाकरा’ येथे, मतलबी सारे,
उतरवू चला,हो तयांची चर्बी…४

*सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे