शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट आठ????????????*
*☄विषय : अत्तराचा दिवा☄*
*????शनिवार : १२/ १० /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*अत्तराचा दिवा*
प्रकाशाचं द्योतक दिवा
जीवनी उजेड देणारा
तेवला अत्तराचा दिवा
सुगंधित सारं करणारा
असाच दिवा लावला
प्रकाश नवा हा दावला
नागपूर पवित्र भूमीत
अत्तराचा दिवा लावला
प्रकाशल्या दाही दिशा
सारा अंधारचं पळाला
प्रफुल्लित झाले सारेच
आयुष्याला अर्थ आला
पर प्रकाशित जगणे ते
स्वयंभू प्रकाशीत झाले
पारावर नसे आनंदाला
जीवनाचे सार्थक झाले
एकोणीशे छप्पन साली
धर्मांतराचे सुटलेय वारे
बुद्धम् शरणम् गच्छामि
जयघोष वदे मुखी सारे
विजया दशमी दिनाला
उसळतो हा जनसागर
बुध्द धम्माचे तत्वज्ञान
स्वीकार ज्ञानाचे आगर
*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*अत्तराचा दिवा*
“अत्तराचा दिवा
लाविते आई ”
“कष्ट करुनी
संसार होई ”
“मांगल्याचा दिवस
एक दिवस येई ”
“पाविते सकलांना
तुळजा भवानी आई ”
“अत्तराचा दिवा
सुगंधीत होई ”
” मंदिरात मानव
प्रसन्नचित्त होई ”
” अत्तराचा दिवा
लावीते सावित्री माई ”
” शिक्षणाची गंगा
घरोघरी जाई ”
” अत्तराचा देवा
शिक्षणाने तेवला ”
” शोषित महिलांचा
अंधार घालवला”
*✍️श्री हणमंत गोरे*
*मु पो :घेरडी, तालुका: सांगोला, जिल्हा :सोलापूर*
*(©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह )*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*अत्तराचा दिवा*
चला लावू लावू चला,
जीव जीवाशीया जीवा…
चारी दिशा सुगंधीत,
करी अत्तराचा दिवा…१
येती हाकेला धावून,
दिसे पाऊले क्वचित…
कशी करू अपेक्षा मी,
भाव मिळेना उचित…२
फिरे सुगंध चौफेर,
कर्तृत्वाच्या जोरावर…
प्रकाशती दिव्य ज्योती,
निर्ढावल्या बळावर…३
द्वेष घृणा अहंकार,
दूर व्हावा दुष्ट भाव…
मनोमनी रूजू द्या रे,
आपुलकी सदभाव…४
गंध हा सुगंध व्हावा,
द्वेष हा प्रितीत न्हावा…
सारे समजा आपुले,
घेण्या मिठीत रे भावा…५
सुगंधात जगण्यात,
आनंदाचे वाहे वारे…
*सुधाकरा* भरे नित्य,
वाटे जे जे सदा प्यारे…६
*सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ५.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*अत्तराचा दिवा*
विरान जिंदगीचे इथे किस्से खूप आहे
नको बळेच काही भाऊबंदकीत हिस्से खूप आहे
का उगाच वल्गना आयुष्य आहे किती ?
जगलास आनंदाने तरी ते खूप आहे
मनात सारखा घोळतो जातीपातीचा दुर्गंध
लाव संविधानाच्या अत्तराचा दिवा हेच खूप आहे
कैक झोपतात उपाशी दसरा असो वा दिवाळी
फेकतो तू उकिरड्यावर तुझ्याकडे खूप आहे
उजळून जावू दे दाहीदिशा तिमीर दाटलेला
एक दिवा आशेचा तरी खूप आहे
*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*अत्तराचा दिवा*
कधी वाटे हवीहवीशी
रात्रीची निरव शांतता
अत्तराचा दिवा जळता
भासे सुगंधीत स्तब्धता ॥१॥
शांत झोपलेली धरा
उरी पांघरलेले आकाश
झुळुक घाली गार वारा
निद्रा लागे सावकाश ॥२॥
ओढलेल्या शालीला
चांदणी नाजूक किनार
अत्तरी दिवा पेटलेला
त्यात पसरलेला तिमिर ॥३॥
सर्व जगाला झोपवून
घरी गेलेला दिनकर
अत्तराचे दिवे लावून
जागवे रात्र रजनीधर ॥४॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*अत्तराचा दिवा*
लावून अत्तराचा दिवा
सुगंधित करू प्रत्येक क्षण
दुर्विचारांना दूर लोटून
सुविचाराने भरुया मन
फुलांप्रमाणे सुगंध असावा
माणसाच्या शब्दांना
आपूलकीचा सांकव
बांधून जपूया मनांना
नका देऊ कुणी कुणाला
अपमानाचे उपहार
मन नका दुखवू कुणी
होऊ एकमेकांचे आधार
अत्तराच्या दिव्याप्रमाणे सुगंधाची
उधळण करुया जीवनी
जगा आणि जगू द्या
एवढेच तंत्र ठेवू मनी
*सौ स्नेहल संजय काळे*
*फलटण सातारा*
*©सदस्य मराठीचे शिलदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*हसरी परी*
सखी-साजणी,माझी तू,
आहेस हसरी परी….,
नैराश्य दूर लोटणारी,
श्रावणातली श्रावण सरी…!
माझ्या हास्याची दोर,
सदैव तुझ्या करी…,
सुखाची छत्र छाया,
नित्य मस्तकी धरी…!
सखे तूच आहेस,
माझी हिंमत खरी….,
प्रसन्नता तुझ्यामुळेच,
नांदते आपल्या घरी…!
प्रसन्नतेचे मूर्तीमंत रुप,
प्रसन्नता प्रसन्न, तुजवरी….,
तुझ्यामुळेच हसरी सकाळ,
उगवते रोज, आपल्या घरी…!!!
उगवते रोज, आपल्या घरी…!!!
*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*अत्तराचा दिवा*
मनात असेल निराशा
पळवून त्याला लावूया
सकारात्मकतेची आशा
मनी ते जागवूया
एकच ध्यास मनी ठेवूनी
दांडगी इच्छा ठेवूया
मिठीत घेऊन सारी स्वप्ने
आव्हानांना उत्तर देऊया
भुलभुलयाच्या जाळेत
नजर चौकस ठेवूया
आमिषाला बळी न पडता
मनावर ताबा ठेवूया
जमिनीवर पाय ठेवून
गंध यशाचा पाहूया
अत्तराचा दिव्या प्रमाणे
जगणे अपुले सार्थक करूया
जन्म मृत्यू कुणाला सोडले
सत्कर्म चला करूया
अत्तराचा दिवा होऊन
किर्ती रूप उरूया
*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन* ????
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖



