
0
5
2
4
6
3
क्षणभंगुर जगणं
जगा मस्त म्हणता सगळे,
मनात काळजीचा डोंगर,
क्षणभंगुर हे आयुष्य तरी,
भीतीचा का धरता थर?
मीडिया नावाची सर्कस ही,
आपल्यालाच नाचवते,
खोट्या बातम्यांच्या जाळ्यात,
सत्याला ती दाबून ठेवते!
चंद पैशांसाठी आज,
लेखणीही विकली जाते,
सत्य गाडून खोटं उचलणं,
व्यवसायात मोजलं जाते!
जनतेच्या वेदना इथे,
TRP मध्ये मोजतात,
रक्ताच्या थेंबांवरही हे,
हसत सौदे करतात!
खोट्या दुनियेच्या बाजारात,
सगळंच विक्रीला आहे,
पण हरवलेली माणुसकी—
तीच सगळ्यात महाग आहे!
डॉ. बालाजी राजूरकर
ता. हिंगणघाट जि. वर्धा
=========
0
5
2
4
6
3



