
0
4
8
2
8
6
अधूरी भरारी
अर्ध्या रे हळकुंडाने
झालास रे तू पिवळा
देव धर्माच्या नावाने
धंदा चालू रे सावळा
घेऊन अधूरी भरारी
झालास फक्त रे शहरी
अजूनही डोक्यात भेद
मानवतेला देतोस छेद
आठवून पाहशील का?
क्रांतीसूर्याचे महान कार्य
अधूरी भरारी रे वेड्या
कुणी तोडल्या रे बेड्या ?
शिक्षणाची उघडली दारं
परिवर्तनाचं फिरतंय वारं
गाडी बंगला पद प्रतिष्ठा
मिळताच गेली कुठे निष्ठा ?
अधूरी भरारी रे मारूनच
राहशील असाच रे गाफील
स्वप्नभंगाने मग फाटलेल्या
हृदयभेगांना कोण झाकील ?
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
=========
0
4
8
2
8
6



