Breaking
कविताचंद्रपूरनागपूरमहाराष्ट्रसाहित्यगंध

तिसरी घंटा; इंदु मुडे

ब्रम्हपुरी

0 4 8 2 9 7

तिसरी घंटा

हे जीवन जणू रंगमंच
इथे सारेच कलाकार
तीन घटकांच्या खेळात
करावा अभिनय साकार

पहिली घटिका बालपनीची
मौन घेऊन येते सुख अंगणी
बालपनीचे ते क्षण सुखाचे
खुलून दिसतात लोचणी

दुसरी घटिका तारुण्याची
कर्तव्याची, जबाबदारीची
सोनेरी स्वप्ने प्रेमाची अन्
ध्येय शिखर गाठण्याची…

श्वास घेण्यासाठी ही…
मिळेना निवांत वेळ
तेव्हाच खेळते नियती
संधी साधून अचूक खेळ…

गजर करते तिसरी घंटा
आसपास नसतांना कुणी
क्षीण श्वासासवे थकले गात्र
मिटती पापण्या कुठल्या क्षणी

संपत येतो आयुष्य खेळ
याच तिसऱ्या घंटे नन्तर
समजून घे रे मानवा येथे
जन्म ते मृत्यूत श्वासाच अंतर.

इंदू मुडे, ब्रम्हपुरी /चंद्रपूर
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे