0
4
8
2
9
0
दिव्याखाली अंधार
पेटविला दिवा पाजळली वाती
पसरला चोहीकडे उजेड
मन शोधते प्रकाश प्रकाश
पण दिव्याखाली अंधार
जगा सांगे ब्रह्मज्ञान
स्वतः कोरडे पाषाण
म्हण आहे जुनी खरी
सर्व असूनही मी बावरी
राधा वाडा उष्टी काढा
संसाराचा हाकला राडा
एकटी चालविते घरचा गाडा
सर्व गेले रिकामा झाला वाडा.
सर्व स्त्रीची एकच व्यथा
तिच्याशिवाय अपुरी कथा
एकटीच रचते घरची गाथा
टेकावा लागतो तिलाच माथा.
सावरते आवरते संसार
रडते विव्हळते जीव होते पसार
प्रकाश वाटून सर्वांना
मन तिचे नेहमीच अंधार
अनु बोईनवाड
जिल्हा नांदेड
0
4
8
2
9
0



