0
4
8
3
0
0
शिक्षक
बालमनावर करुनी संस्कार
घडवितोस इतिहास नवा
संस्कृतीचा उपासक तू करतोस मानवसेवा
ध्यास तुला शिक्षणाचा,छंद तुला अध्यापनाचा
पूजक तू सरस्वतीचा,
नाद ना तुला लक्ष्मीमागे धावण्याचा
घेतलास वसा तू.. राष्ट्रनिर्मितीचा
बालमनातील अंधकार दूर सारण्याचा
मनामनात सुसंस्कार रुजविण्याचा
कलाकार तू..मुर्तीकार तू.. रचनाकार तू
देतोस योग्य आकार मातीच्या गोळ्याला
घडवितोस संस्कारक्षम बाळाला
जपतोस तू माणसांचे माणूसपण
शिकवतोस उनाडांना शहाणपण
विसरून तुझे मोठेपण,स्मरतोस तू बालपण
ज्ञान कौशल्याने करतोस मनोरंजन
जपतोस तू बालकांना मायच्या ममतेन
यातच दडलंय तुझे थोरपण
अखंड घडव तू सानं- थोरजण
करतो तुला वंदन,शिक्षका तुज कोटी कोटी नमन.
अनिल मेश्राम
सौंदड जिल्हा-गोंदिया
======
0
4
8
3
0
0



