Breaking
आरोग्य व शिक्षणधाराशिवमराठवाडाविदर्भसाहित्यगंध

हे सर्व संतसेवेचं फळ …!!!

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर

0 5 4 7 4 5

हे सर्व संतसेवेचं फळ …!!!

महागुरू कृपा निवास, उमरगा येथे दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी, शनिवारच्या पवित्र संध्याकाळी सुमारे ७ वाजता ‘सदगुरू गहिनीनाथ महाराज औसेकर’ यांचे आगमन झाले. त्यांच्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. खरोखरच “संत येती घरा, तोची दिवाळी दसरा” या उक्तीप्रमाणे त्या दिवशी आमच्या घरी दिवाळी-दसऱ्याचा उत्सवच अवतरला होता. माझे वडील कै. गुरलिंगप्पा माशाळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य सदगुरूंच्या सेवेत अर्पण केले. तसेच माझी आई कै. महादेवी माशाळकर यांनीही अखेरपर्यंत निष्ठेने सेवा केली. त्यांच्या या अखंड सेवाभावामुळे आमच्या कुटुंबावर सदैव गुरूकृपेचा वर्षाव होत राहिला.

आज आम्ही दोघे भाऊ आणि एक बहीण तिघेही आपापल्या नोकरीत स्थिर आहोत. हे सर्व संतसेवेचेच फळ आहे, अशी आमची ठाम श्रद्धा आहे. “हे तो एक संताठायी लाभ, पायी उत्तम” या वचनाप्रमाणे संतांच्या चरणी लाभलेले हे सौभाग्य अमूल्य आहे. “म्हणविता त्यांचा दास पुढे, आस उरेना” ही भावना आमच्या अंत:करणात सदैव जागृत आहे. संतांचे कृपादान हे इतके महान असते की ते कल्पांतीही संपत नाही. म्हणूनच मीही संतसेवेलाच जीवनाचे सर्वोत्तम ध्येय मानून त्या मार्गावर चालत आहे. संतांच्या चरणी सेवा करणे, हाच माझ्यासाठी खरा आनंद आणि जीवनाचा खरा अर्थ आहे.

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
उमरगा ता.उमरगा, जिल्हा धाराशिव

===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 4 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे