‘प्रज्ञेची क्रांतीस्थळे पुस्तकाचे थाटात प्रकाशन’
जिल्हा प्रतिनिधी,नागपूर
‘प्रज्ञेची क्रांतीस्थळे पुस्तकाचे थाटात प्रकाशन’
जिल्हा प्रतिनिधी,नागपूर
नागपूर:(दि.८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पाउलखुणा उमटलेल्या स्थळांचा माहितीचे संकलन करुन एकूण 50 स्थळाचा समावेश असलेल्या ’प्रज्ञेची क्रांतीस्थळे‘ या सामाजिक कार्यकर्ते राजकुमार वंजारी लिखित पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार दि.08 ऑक्टोबर 2024 रोजी विदर्भ हिंदी साहित्य संम्मेलन मोर भवन नागपूर येथील नटराज सभागृहात उत्साहात पार पडले.
शहरातील ‘स्त्रीभूषण रमाई आंबेडकर’ संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भदंत नागदीपंकर महाथेरो होते. मार्गदर्शक भदंत संघरत्न मानके होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार नानाजी शामकुळे, माजी आमदार उपेंद्र शेंडे, वरिष्ठ पत्रकार अनिल वासनिक, मंचावर राजकुमार वंजारी, विलास गजभिये, अमोल शामकुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम भगवान बुद्ध,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाई आंबेडकर, व बॅरिं.राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी सर्व पाहुण्यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी प्रास्ताविक लेखक राजकुमार वंजारी यांनी केले आणि पुस्तक निर्मिती मागील भूमिका विषद केली. याप्रसंगी नानाजी शामकुळे, उपेंद्र शेंडे,अनिल वासनिक यांनी पुस्तकावर भाष्य केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत नागदीपंकर, यांनी जनतेला नविन इतिहास आणि स्थळांची माहिती मिळणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास भदंत संघरत्न मानके यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन विलास गजभिये यांनी केले तर आभार प्रदेशन हरिदास बेलेकर यांनी मानले. कार्यक्रमास दिलीप तांदळे, दिलीप सोनडवले, कृष्णा बोरकर, रमेश ढवळे, प्रियंका देशपांडे, वंदना निकोसे, प्रगती पारसी, मीरा मदनकर, चंद्रभान भोवते, प्रा.मुंकुद मेश्राम, कवि मनोहर गजभिये, ज्ञानदेव गजभिये, अश्विन पिलेवार, विलास पिलेवान, कवि मनोहर गजभीये व धर्मपाल वंजारी यांचासह मोठया संखेत कार्यकर्ते उपस्थित होते.



