
0
5
1
7
9
6
एक मिठी प्रेमाची
विरहाच्या वेदनेने
मेघ सर्द सर्द गं
आभाळाला मातीचे
पिसे गर्द गर्द गं
उमलण्यासाठी पुन्हा
मिटावेच लागते
फिरून पुन्हा येण्यासाठी
परतावेच गं लागते
विरहाची का कधी
कल्पना गं रुचते ?
परतीची सर अशी का
ओढाळ गं बरसते ?
तव एक मिठी प्रेमाची
गवसे अनुबंध गं
पाना-फुलात दाट तो
भेटीचा सुगंध गं
विरहाचा शाप असा
का असोशीला लाभतो ?
अंतरीचा ओढाळपणा
का असोशीने दाटतो ?
कणाकणात तुझ्या असे
पेरले मलाच मी
मीच अंकुरलो, फुललो,
प्रकाशलो सवे तमी
जपशील ना खुणा सखे,
ओठांत प्रीतीची गाणी
स्वप्न हिरवे सजवूया
अंतरात गं क्षणोक्षणी
वृंदा (चित्रा) करमरकर
जिल्हा सांगली
==========
0
5
1
7
9
6



