कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
असा पाऊस यावा; दीपककुमार सरदार
0
4
8
2
9
0
असा पाऊस यावा
असा पाऊस यावा
सारेजन सुखी व्हावे
चेहऱ्यावर त्यांच्या
आनंदी भाव दिसावे.
असा पाऊस पडावा
पिके तरारून यावी
बळीराजाला कसली
मनी चिंता नसावी.
येई महापुर संकट
पडू नको संततधार
नको हिरावून घेऊ
त्यांचा उघडा संसार.
ओसंडून वाहू दे
खळाळूनी नदीनाले
धनधान्य पिकू दे
बारमाही खायाले.
नित्य बरसू नको
झोप लागत नाही
जुने पतराचं घर
सदा गळतच राही.
असा पाऊस यावा
हर्ष सर्वांना व्हावा
सारा निसर्ग बहरावा
स्वर्ग रानात दिसावा.
दीपककुमार सरदार
ता.लोणार जिल्हा बुलढाणा
0
4
8
2
9
0



