ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनखानदेशदेश-विदेशसाहित्यगंध
उत्सव चैतन्याचा
संध्या मनोज पाटील अंकलेश्वर, गुजरात

0
6
3
9
6
0
उत्सव चैतन्याचा
सजली सारी ऋषिकेश नगरी
उजळून निघाल्या दिशा चारी
दीस सोनियाचा उजाडला आज
उत्सव चैतन्याचा रंगला भारी..
पवित्र गंगा किनारी जमलाय
शुद्ध पवित्र आत्म्याचा गोतावळा
आज साजरा होणार माझ्या
परमात्म्याचा जन्मदिन सोहळा..
दीपावलीचा पावन पर्व सांगे
पेटवू या आत्मदिपक अंतरी
स्वयं प्रकाशाने उजळून काढू
असतील अंधारल्या दिशा जरी..
आत्मभावनेच्या पेटल्या पणत्या
सद्भावना झाली प्रकाशमय
दीपावलीच्या शुभ दिनी झाला
सारा गंगा घाट परमात्मामय…
त्रिवेणी संगम जणू घटित झाला
तीर्थक्षेत्री रंगला चैतन्य सोहळा
गंगेच्या लहरीही गुणगुणू लागल्या
आला उत्सव चैतन्याचा आला..
आला उत्सव चैतन्याचा आला..
संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर, गुजरात
0
6
3
9
6
0



