ई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध
सापशिडी

0
4
8
2
9
0
सापशिडी
चौरसाकृती आकार
त्यावर कप्पे चौकोनी
खेळ लहान मोठ्यांचा
पृष्ठ असते जाड पानी
शिडी भेटता सोंगटी
उंचावर जाते सर सर
सापाच्या तोंडात जाता
खाली येते घसर घसर
सापशिडी बैठक खेळ
खेळ आहे हा पारंपरिक
मनोरंजन करतो भारी
सगळीकडे नावलौकिक
सोंगटीचे फासे टाकू
चढाओढ हसत खेळत
बुद्धीचा विकास होतो
खेळातून होवू प्रगत
आकड्यांचे ज्ञान होते
वाढते समयसूचकता
खेळामधून हार जित
शिकू खेळता खेळता
सौ.आशा कोवे- गेडाम
वणी जि.यवतमाळ
0
4
8
2
9
0



