प्रदूषण जगण्याच्या वाटेतला भयंकर राक्षस
गजवंती सुभाष विघ्ने बडनेरा -अमरावती

प्रदूषण जगण्याच्या वाटेतला भयंकर राक्षस
झाली एकदाची दिवाळी, तो फटाक्यांचा विस्फोटक आवाज, हृदयात धडकी भरवणारा कर्कश्य दनदनाट ! लक्ष्मीपूजनाच्या रात्रीला बडनेरा -अमरावती मध्ये रात्री दोन पर्यंत फटाके फुटत होते, एकीकडे दुष्काळ दुसरीकडे फटाके रूपी लक्ष्मी प्रदर्शन. शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं किंवा कामगारांचं दुखणं एकीकडे, परंतु अशा सण आणि उत्सवांमध्ये श्रीमंतांचा थाट आणि झगमगाट पहावयास मिळतो.
एकदा एका ओळखीच्या घराजवळच्या व्यापाऱ्याला विचारलं, “भैय्या इतनी देर ऱात तक पटाखोकी लडिया क्यू ?तर जितना पटाखे फोडोगें, उतनी लक्ष्मी आती है |असं त्यांचं म्हणणं. कशी श्रद्धा आणि मान्यता असो. कारखान्यातील सांडपाण्यामुळे आजूबाजूची शेती आणि गावांवर परिणाम होत आहे नापिक जमीन आणि प्रदूषित गावामुळे गावकरी गाव सोडून शहरात स्थलांतरित होत आहेत मोकळे ढाकळे व स्वच्छ गाव सोडून शहरातल्या गल्लीबोळात भाड्याने राहतात, गावकरी एकाएकी स्थलांतरित होत नाही तर उदासीन स्थानिक संस्था,व वेळ काढू धोरणामुळे त्यांना गाव सोडने भाग पडते. शासनही लाभापोटी याकडे दुर्लक्ष करते. एकीकडे विकास दुसरीकडे मानवी विनाश, पर्यावरणाचा विनाश !
उद्योगपती मिळेल तिथे जमीन काबीज करून उद्योग करतात. सिमेंट उद्योगामुळे ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण होते ते वेगळेच. फटाक्यांच्या कचरा व धुळीमुळे मुंबई महानगरपालिकेने पाण्याचे दुर्भिक्ष असूनही रस्ते स्वच्छ करण्याचा घाट घातला आहे कारण काय तर वायु प्रदूषण कमी व्हावे. पुण्याच्या महानगरपालिकेत काम करणारा एक सामान्य नागरिक विद्यानंद बापट याने गणेशोत्सवापूर्वी एकट्याने जाहीरपणे विरोध केला. त्याचं म्हणणं असं की, एखादा उत्सव, सण मोठ्या बंद हॉलमध्ये साजरा करा. लाउड स्पीकर ,डीजे अशा त्रास होणाऱ्या गोष्टी सोडून सण उत्सव साजरे करा, त्याच्या या वक्तव्याचा किती विपर्यास झाला !
त्यासाठी त्याला मारहाण, धमक्या मिळाल्या, यावरही शासन गप्प ! काय करणार ? परंपरा आणि संस्कृती जतन करणारे सत्ताधीश अशा घटनांना थोडी आवर घालणार ? वृत्तपत्रातून अशा गोष्टींवर चर्चा होते आणि मग सर्व काही शांत. तरी बरे उत्सवाच्या वेळेस शासनाने कितीही नियम आखून दिले तरी विसर्जनाच्या वेळेस विपरीत घटना घडतातच, यावरही काही बोललं जात नाही. नागरिकही घेतलेला अनुभव टाकून पुढच्या वर्षी पुन्हा तेच करणार, याला काय म्हणावं ? नुसतेच शासनाला दोष देऊन काही फायदा नाही लोकं पण काळजी घेऊन उत्सव साजरा करताना दिसले पाहिजेत पण असं होत नाही त्यामुळे हे चालायचंच.
तीन ते चार वर्षांपूर्वी जुही चावला हिने मुंबईतल्या मोबाईल टॉवर बद्दलआवाज उठवला होता तिचं म्हणणं होतं माझ्या घराजवळ मोबाईल टॉवर नको, पण आज आपण पाहतो गगनचुंबी इमारतींवर टॉवर जिकडे तिकडे दिसतातच. एकट्यानं आवाज उठवून चालत नाही विकासाच्या नावाखाली सगळं काही दबून जातं. 90 ते 2000 या दशकातील लोकप्रिय गायिका अलका याग्निक या तर ठार बहिऱ्या झाल्या आहेत त्यांच्याबद्दल बरंच वाचलं काही उपाय नाही म्हणे अलीकडेच त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार मिळाला त्या सोहळ्यात आजारी असल्याचे स्पष्टपणे दिसत होत्या इतकं सगळं ऐश्वर्या असूनही त्यावर उपाय नसणे ही एक प्रकारे शोकांतिकाच आहे, सामान्य जनतेलाही बहिरेपण येते त्याची दखल कोण घेते ? पण यानिमित्ताने ध्वनी प्रदूषणाचा किती भयंकर परिणाम होतो हे लक्षात येते.
पूर्वी रस्त्यांवर जास्त वर्दळ व आवाज होत नसल्यामुळे दूरचेही बरेच काही ऐकायला यायचे पण आता तर नुसता गोंगाटच असतो, रस्ते चकचकीत व गुळगुळीत झाल्यामुळे व वेगावर नियंत्रण नसल्यामुळे रोजचे शंभर दीडशे लोकांचे मरण ठरलेलेच. डीजे आणि ढोल ताशांच्या गजरामुळे अनेकांना हार्ट अटॅक येतो. लहान मुले आजारी व वृद्ध माणसं यांचाही विचार केला जात नाही आनंदाच्या भरात जो तो झिंगाट. बाळाचा जन्म झाल्यावर एकाने त्याचा आनंदोत्सव साजरा करताना ढोल व ताशे लावले बिचारे बाळ .. ते कधी मरून पडले याची कुणाला चिंता नाही सगळं झाल्यावर आई व बाळाकडे लक्ष गेल्यावर आई अस्वस्थ तर बाळ निपचित पडले होते, सारं काही संपलं होतं.
आनंद साजरा करणारे सोडा पण काही समजावून सांगणारे लोकही त्यांना मिळाले नाही काय ? हा प्रश्नच आहे अशा घटना ऐकायला आल्यावर काय बोलावे हे कळतच नाही. प्रदूषणाचे इतके सगळे महाभयंकर परिणाम असूनही आपण धार्मिक श्रद्धा आणि आनंदात सगळं काही सहन करतो, गंगा या पवित्र नदी बद्दल मी काय सांगावं ? एकीकडे नदीमध्ये सोडणारे मृतदेह, अंत्यसंस्कारानंतरच्या विधी, त्यातच अनेक प्रकारच्या धार्मिक विधी यामुळे गंगेचे पाणी किती प्रदूषित होते हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणूनच तर पंतप्रधानांनाही ‘नमामि गंगे’सारखे उपक्रम राबवावे लागतात.
मला तर वाटते- जनकल्याणासाठी शासनाने कठोर कायदा करावा प्रत्येक जाती-धर्माच्या उत्सवांना ठराविक नियम आखून द्यावे सण साजरा करताना पाळावयाच्या सूची जाहीर करणे यामध्ये जर कोणी उल्लंघन करत असेल तर कायद्याद्वारे त्यांच्यावर कारवाई करावी. तरच हे काही अंशी तरी थांबेल नाहीतर हे असंच चालत राहील.मतपेटीचा विचार सोडून द्यावा लागेल, लोक कल्याणासाठी घेतलेल्या कार्याबद्दल जनतेला ही तक्रार राहणार नाही असे मला तरी वाटते.
गजवंती सुभाष विघ्ने
बडनेरा -अमरावती
======



