होळीच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक रंगाने उजळली संध्याकाळ
फुलांच्या होळीच्या गीतांनी वातावरण चैतन्यमय
होळीच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक रंगाने उजळली संध्याकाळ
नई युवा उडान तर्फे चर्चासत्राचे आयोजन संपन्न
फुलांच्या होळीच्या गीतांनी वातावरण चैतन्यमय
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर : (दि २) शहरातील ‘नई युवा उडान’ संस्थेच्या वतीने बदलते कुटुंब व्यवस्था आणि जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर वृद्धाश्रमांची गरज की आरामदायी घरांचा पर्याय ? या विषयावरील विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम विदर्भ हिंदी साहित्य संमेलनात नुकताच पार पडला.
याप्रसंगी तरुण आणि ज्येष्ठ पिढीने एकत्र येत विचारांची देवाणघेवाण केली. वर्तमानातील वृद्धाश्रमांची आवश्यकता, विभक्त कुटुंब पद्धती आणि ज्येष्ठांची मानसिक स्थिती यासारख्या संवेदनशील विषयावर सखोल चर्चा झाली. विविध संस्थांमधून आलेल्या प्रतिनिधींनी आणि तरुणांनी आपले अनुभव व्यक्त केले. या चर्चेतून केवळ समस्या मांडल्या गेल्या नाहीत तर पिढ्यांमधील दरी कमी करण्यासाठी समाजाचे माध्यम कसे निर्माण करता येईल. यावरही भर देण्यात आला.
यशस्वी आयोजनासाठी शशी तिवारी यांच्यासह सह- संयोजक दिप्ती तिवारी, कणक शर्मा, लतिका मिश्रा, रुची बोस, प्रियंका तिवारी, मिनू गुप्ता, श्वेता वर्मा, प्रिती दुबे, निरंजना गांधी आणि शिवानी सिंह यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी ज्येष्ठांचा आदर आणि त्यांच्या प्रति संवेदनशील राहण्याचे आवाहन केले गेले. यावेळी फुलांच्या होळीच्या गीतांनी वातावरण चैतन्य भाराऊन गेले होते. हेमलता मिश्रा, सुमन मिश्रा, हेमा तिवारी, सुजाता दुबे आणि श्रद्धा भारद्वाज यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.



