
0
5
6
8
0
0
ज्ञानप्रकाश
जेथे अज्ञान अंधःकार
तेथे होवून ज्ञानप्रकाश
सकल जना उद्धारावे
उजळो सर्वांचे आकाश.. //
जे कोणी श्रेष्ठ ज्ञानवंत
त्याकडून शिकून घ्यावे
जे जे आपणास ठावे
ते ते सारे इतरांस द्यावे.. //
जे वाटल्याने वाढतेय
ते केवळ एकमेव ज्ञान
घेणारा समृद्ध होत राही
देणार्याला मान सन्मान.. //
इवलीशी ज्ञान शलाखा
मन गाभारा उजळते
चाचपडणार्या जीवास
दिशा दर्शक रेष ठरते.. //
जर कुणी नडले अडले
व्हावे त्याचे तारणहार
भरकटली जीवननौका
सहज करून द्यावी पार.. //
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
0
5
6
8
0
0



