Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरचारोळीनागपूरसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 3 0 0

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट अकरा🌈🌈🌈*

*☄विषय : संकटसमयी☄*
*🍂शनिवार : २६ / एप्रिल /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*संकटसमयी*

चूक आणि बरोबर काय
याची जाणीव करून देतो
जिवाभावाचा तो मित्र
संकटसमयी धावून येतो

*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿
*संकटसमयी*

संकटसमयी येते
ईश्वराची आठवण
नवससायास बोलून
करतात आळवण.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿
*संकटसमयी*

*संकटसमयी धावूनी येई*
*तोच खरा मित्र*॥
*असेच रहावे मजवरी*
*तयाचे कृपाछत्र*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿
*संकटसमयी*

आईच धावून येत असते
खरं सदा हो संकटसमयी,
शक्ती देतसे उभी राहूनच
पाठी हात हो ममतामयी.

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿
*संकटसमयी*

आपली माणसं आपलीच असतात
संकटसमयी सोडून जाणारी आपली नसतात
केवळ आपलेपणाचा देखावा करतात
आपल्या- परक्याची कसोटी संकट घेतात

*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे. राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेची नोंदणी दि ३०/०४/२०२५ पर्यंत करावी*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*संकटसमयी*

जीवाची पर्वा न करता
संकटसमयी
पर्यटकांसाठी तो धावून आला
दहशतवाद्यांनी मात्र
त्याच्यावरच निशाणा साधला

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार*समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿
*संकटसमयी*

धाऊन येतो संकटसमयी
तोच एक रे मित्र खरा
ढिगभर मनोरंजनापेक्षा
जीवाभावाचा एक मित्र बरा

*सविता धमगाये,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿
*संकटसमयी*

हारत होता लढा श्वासांचा,
संकटसमयी तुच साथ दिली
श्रद्धेचा तू मान राखला देवा
माझी जीवन रेषा नव्याने कोरली

*सौ.संध्या मानिज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या.*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿
*संकटसमयी*

संकटसमयी झुंजतात सैनिक
लढती जीवाची पर्वा न करता
सांगा बरं तो परत येईल कसा
दुश्मनाला देशाच्या न मारता

*श्री.भोसले तानाजी निवृत्तीराव*
*देगलूर जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿
*संकटसमयी*

कुटुंबातली अगणित संख्या
सुखात असती पुढे पुढे…
संकटसमयी दुरून डोंगर साजरे
कळत असून माना हिकडे तिकडे

*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿
*संकटसमयी*

संकटसमयी मदत करणारांना
कधीच रे विसरू नका …..
त्यांच्या गरजेवेळी मात्र
मदतीचे वेळीच पाऊल टाका…

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🪷📚➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे