0
4
8
2
8
4
जळणाऱ्यांची दुनिया
कुणाला आनंद असतो
स्वतः यशस्वी होण्यात,
कुणाला आनंद मिळतो
कुणाचे अपयश पाहण्यात.
कुणाला नाही आवडत
दुसऱ्याचे कौतुक करणे,
चांगले घडले असले तरी
न आवडे डोळ्यांनी पाहणे.
श्रमाचे फळ मिळते श्रम
करणाऱ्यांनाच जीवनात,
जळणारे जळत राहतील
न पडणार काही पदरात.
कुणी करतील कौतुक
समोरासमोर भेटताच,
शिव्या-शापच देतात
मागे वळून पाहताच.
सर्वांना आनंदी ठेवणारा
अजूनही नाही जन्मला,
नको घालवू व्यर्थ जीवन
अडकून पापाच्या कर्माला.
डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
0
4
8
2
8
4



