Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनवी दिल्लीमहाराष्ट्र

जागतिक तबलावादक ‘उस्ताद’ हरपले; अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास

सॅन फ्रान्सिस्को इथल्या रुग्णालयात सुरू होते उपचार

0 1 9 3 6 2

जागतिक तबलावादक ‘उस्ताद’ हरपले; अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास

सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद जाकिर हुसैन यांचे अमेरिकेतील रुग्णालयात निधन

सॅन फ्रान्सिस्को इथल्या रुग्णालयात सुरू होते उपचार

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

नवी दिल्ली: जगविख्यात तबलावादक उस्ताद जाकीर हुसैन यांन अत्यवस्थ वाटत असल्यानं अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी संगीत, कलाक्षेत्रातल्या दिग्गजांसह जगभर पसरलेले त्यांचे चाहते प्रार्थना करीत होते.

51 व्या ग्रॅमी पुरस्कारानं सन्मान

जगप्रसिद्ध तबलावादक ‘पद्मविभूषण’ उस्ताद जाकीर हुसैन अमेरिकेत वास्तव्याला होते. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथल्या नामवंत डॉक्टरांची टीम जाकीर हुसैन यांच्यावर उपचार करत होती. 9 मार्च 1951 रोजी मुंबईत जन्मलेल्या उस्ताद जाकिर हुसैन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये ‘पद्मभूषण’ आणि 2023 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 2009 मध्ये त्यांना 51 व्या ग्रॅमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

जाकीर हुसैन यांनी चित्रपटातही केलंय काम

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. प्रख्यात तबलावादक अल्लाखाँ खान हे त्यांचे पिता असल्यानं लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. अल्पावधीतच म्हणजे वयाच्या 12 व्या वर्षापासून जाकीर हुसैन यांनी देशभरात तबला वादन परफॉर्म करण्यास सुरुवात केली. तालवाद्यावर जाकीर यांनी अक्षरशः हुकूमत असल्याचं जगाला दाखवून दिलं. जाकीर यांनी आपले प्राथमिक शिक्षण माहीम, मुंबई येथील सेंट मायकल हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर नंतर सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यांनी संगीत आणि शिक्षण दोन्ही क्षेत्रात ज्ञानाचा पाया भक्कम केला. हुसैन यांनी अँटोनिया मिनेकोला या कथ्थक नृत्यांगना आणि शिक्षिका यांच्याशी विवाह केला. त्यांना अनिसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी या दोन मुली आहेत. सई परांजपे दिग्दर्शित ‘साज’ या चित्रपटात जाकीर हुसैन यांनी अभिनयही केला आहे. झाकीर हुसैन यांनी ‘हीट अँड डस्ट’सह काही चित्रपटांमध्येही काम केले. त्यांनी भूमिका केलेला ‘मंकी मॅन’ 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता.

सुरुवातीला मृत्यूची अफवा, त्यानंतर जाकीर यांचा मृत्यू – तबल्याचे जादूगार जाकीर हुसेन यांच्या निधनाचे वृत्त सुरुवातीला माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह विविध नामवंत व्यक्तींनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिले. मात्र, ते वृत्त खोटे आणि चुकीचे असल्याचे दिसून आल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एक्स मीडियावरील पोस्ट काढू टाकली. जाकीर यांची बहीण खुर्शीद आलिया यांनी जाकीर हे जिवंत असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचं वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हटलं होतं. त्यानंतर उशिरा त्यांच्या नातेवाईकांना जाकीर यांचा मृत्यू झाल्याची माहिती वृत्तसंस्थेला दिली.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 9 3 6 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
10:56