बीड आकाशवाणीवर शनिवारी ‘अक्षरलेणी’ काव्यवाचनाचे प्रसारण
प्रा. भारत सोळंके यांच्या काव्य सादरीकरणाचा नजराणा
बीड आकाशवाणीवर शनिवारी ‘अक्षरलेणी’ काव्यवाचनाचे प्रसारण
प्रा. भारत सोळंके यांच्या काव्य सादरीकरणाचा नजराणा
जिल्हा प्रतिनिधी बीड
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
बीड/ माजलगाव (दि 20 नोव्हेंबर): तालुक्यातील सादोळा गावचे भूमिपुत्र उत्तम कवी व लेखक असलेले प्रा. भारत सोळंके यांचा जीवन प्रवास व काव्यवाचनाचा (अक्षरलेणी) मराठी साहित्य विषयक कार्यक्रम (दि २२) शनिवारी आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित होणार आहे.
सोळंके यांच्या आयुष्यातील साक्षीदार असलेल्या लोकांनी या बाबत समाधान व्यक्त केले आहे. तथा टॅम्पो ड्रायव्हर ते प्राध्यापक असा शिक्षणासाठी मोठा संघर्ष करणारे ते माजलगाव तालुक्यात तरी एकमेव व्यक्तीमत्व आहे, त्यामुळे उत्सुकता आहे.
भारत सोळंके हे विविध मासिक, दिवाळी अंकात लेखन करीत असतात त्यांचा पी.एच.डी चा विषय हा कुसुमाग्रज आणि गुलजार यांच्या कवितेचा तौलनिक अभ्यास हा आहे. मराठी भाषेवर त्यांचे भरपूर प्रेम असून नवोदितांना मराठी साहित्यात ऋची निर्माण व्हावी या साठी त्यांचा विशेष प्रयत्न असतो. दि.२२ नोव्हेंबर रोजी शनिवार सकाळी ११ वाजता बीड आकाशवाणीवरून कार्यक्रम प्रसारित होणार आहे तरी नक्की आनंद घ्यावा असे काव्यरसिकाकडून आवाहन करण्यात येत आहे.



