सेवानिवृत्ती निमित्त ‘हरिश्चंद्र दहाघाने’ यांचा सत्कार सोहळा १९ रोजी
मित्र परिवारांना दहाघाने कुटुंबातर्फे अगत्याचे आमंत्रण
सेवानिवृत्ती निमित्त ‘हरिश्चंद्र दहाघाने’ यांचा सत्कार सोहळा १९ रोजी
मित्र परिवारांना दहाघाने कुटुंबातर्फे अगत्याचे आमंत्रण
रजत डेकाटे, तालुका प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर: आयुष्यात प्रत्येकालाच आपल्या सेवेतून निवृत्त व्हावे लागते. नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून मागील महिन्यात सेवानिवृत्त झालेले नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात सेवाव्रत असलेले श्री हरिश्चंद्र माधवराव दहाघाने, केंद्रप्रमुख उदासा तथा (प्रभारी) शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती उमरेड यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ (दि १९) रोजी सायं. ४.३० वाजता ‘दि टायगर पॅराडाईज रिसॉर्ट अँड वाटर पार्क, तिरखुरा, ता.उमरेड जि. नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
हरिश्चंद्र माधवराव दहाघाने, केंद्रप्रमुख उदासा तथा (प्रभारी) शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती उमरेड हे शिक्षकप्रिय व विद्यार्थीप्रिय म्हणून परिचित आहेत. ते ३० जून २०२४ रोजी आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाले असून, त्यांची सुकन्या कुमारी इशिका हरिश्चंद्र दहाघाने हीने एम.बी.बी.एस. ची पदवी (रशिया) येथून उत्तीर्ण केली आहे. वडिलांचा व मुलींचा सत्कार एकाच दिवशी व्हावा असा योग जुळून आला असल्याने सर्व मित्र, परिवार, आप्तेष्ट व कुटुंब सदस्यांनी या सत्कार समारंभास आवर्जून उपस्थित राहण्यासाठी दहाघाने कुटुंबातर्फे अगत्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. तरी सर्वांनी या समारंभास उपस्थित राहून सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्यात.



