
0
5
1
7
5
8
नारीशक्ती
पहाटंच बसून जात्यावर
मुखोगत ओव्या गायली
बहिणाबाईंच्या नारीशक्तीने
अज्ञानाला मूठमाती दिली
मातलेल्या पातशाहीला
शिकवला धडा शिवबांनी
प्रेरणा होती नारीशक्तीची
घडवला राजा जिजाऊंनी
अंधश्रद्धेच्या भीतीपोटी
शिक्षणाची अबाळ झाली
क्रांतीसूर्याच्या सावित्रीनी
बहुजनांना दिशा दाखवली
होती अहिल्या रणरागिणी
गाजवले धुरंधर रणमैदानं
दीनदलीतांच्या हक्कासाठी
घडवला भीम रमाभिमाईनं
जिद्द चिकाटीच्या कर्तृत्वाने
स्वयंभू गगनभरारी घेतली
भारताच्या या नारीशक्तीने
सकल क्षेत्रे पादाक्रांत केली
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
========
0
5
1
7
5
8



