Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगोंदियाविदर्भ

न्यू मून इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये HPV लसीकरण जनजागृती कार्यशाळा यशस्वी

प्रा. तारका रूखमोडे, प्रतिनिधी

0 5 2 4 6 3

न्यू मून इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये HPV लसीकरण जनजागृती कार्यशाळा यशस्वी

प्रा. तारका रूखमोडे, प्रतिनिधी

जिल्हा गोंदिया, बिनधास्त न्यूज

गोंदिया/ अर्जुनी मोर:(दि २४ मार्च) न्यू मून इंग्लिश मिडीयम स्कूल तथा सायन्स ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थिनी व पालकांसाठी HPV (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरणाबाबत मार्गदर्शनीय कार्यशाळा ठेवण्यात आली होती.या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे व गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगणे हा होता.यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. के. किरसान वैद्यकीय अधिकारी कोरंभीटोला यांना आमंत्रित करण्यात आले.

या कार्यशाळेत डॉ.के.किरसान यांनी HPV विषाणू, त्याचे दुष्परिणाम तसेच लसीकरणाचे फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की योग्य वयात HPV लस घेतल्यास गर्भाशय मुखाचा कर्करोग मोठ्या प्रमाणात टाळता येतो. विद्यार्थिनी व पालकांना लसीकरण सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले तसेच सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यशाळेत वर्ग ६ वी ते ११ वी च्या विद्यार्थिनी व जागृत पालक उपस्थित होते . प्रश्नोत्तरस्वरूप संवादातून विद्यार्थिनींनी व पालकांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. शेवटी सर्वांना आरोग्यदायी जीवनशैली व लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

प्रा.तारका रुखमोडे यांनी अशा जागृतता निर्माण करणाऱ्या कार्यशाळा केवळ शाळा पातळीवरच नव्हेत तर सामाजिक पातळीवर सुद्धा घेण्यात याव्यात जेणे करून प्रत्येकाच्या मनातील लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर होतील व सुदृढ व सुरक्षित मातृत्व निर्माण देशोन्नतीसाठी हितकारक ठरेल असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य राकेश उंदिरवाडे , पर्यवेक्षिका प्रा. तारका रुखमोडे,प्रा.निकीता मानापुरे, निकीता बन्सोड व शिक्षकवृंद यांनी विशेष सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 4 6 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे