Breaking
ई-पेपरकविताखानदेशदेश-विदेशसाहित्यगंध

हेराफेरी

संध्या मनोज पाटील अंकलेश्वर, गुजरात

0 5 9 6 9 7

हेराफेरी

दिवसेंदिवस रंगतोय खेळ
राजकारणी वृत्तीचा जोमात
याची टोपी त्याच्या डोक्यावर
सामान्य जनता जाते कोमात..

कर्जमाफीने करतात खुश
साध्याभोळ्या बळीराजाला
लाडकी बहीण म्हणून ओवाळणीत
लुटताय तिच्याच घरादाराला..

कोण खरे आणि कोण खोटे
जनतेला दाखवतात पंजाची बोटे
विरोधकांनाही चांगलेच फावते
आज काय तर उद्या काय चावते..

हेराफेरी शब्दांची करून नेहमी
तात्पुरती मनधरणी ते करतात
आपल्याच दिलेल्या आश्वासनांना
कोणते पक्ष कधी कुठे पळतात..

ऊठसूठ सगळीकडे आंदोलने जारी
कोणाला नसते का बारा तासाची नोकरी
कष्टाची रोजी रोटी जेव्हा कमावतील
शाब्दिक लढाया नाही का विसरतील..

कधी कधी वाटते जनताही दोषी
सर्रास पैसे घेऊन निवडून देतात नेते
एका हाताने हो कुठे टाळी वाजते
हेराफेरी तर दोन्ही बाजूंनी होते..
हेराफेरी तर दोन्ही बाजूंनी होते..!

संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर, गुजरात
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 6 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे