Breaking
ई-पेपरकवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

जीवनाच्या शाळेत….

0 4 8 2 9 7

जीवनाच्या शाळेत….

जीवनाच्या शाळेत काय घडे,
परिस्थिती शिकवते जीवन धडे,
सुखात येती दुःखाचे खडे,
सत्कर्माने आपले नशीब घडे//१//

जीवन एक सुंदर प्रवास,
प्रत्येक वळणावर शिकवण खास,
अडचणीतून टाकतो पाऊल,
यशोशिखराची लागते चाहूल//२//

सुख-दुःख हे क्षणभंगुर,
नमिळता मानावे आंबट अंगूर,
अनुभवातून मिळवलेले ज्ञान,
हेच जीवनाचे सुंदर पान //३//

स्वप्न पहावी भव्य,
बळ मिळते दिव्य,
त्यातूनच घडतो एकलव्य,
जीवन सार्थक काव्य//४//

ध्येय नवे गाठतांना,
परिश्रमाची जोड देतांना,
आत्मविश्वास दिसतो वाढतांना,
दिसे समाधान डोळ्यात हसतांना//५//

जीवन अनेक नात्यांची गुंत ,
मनी रुतलेली अबोल खंत,
ऐकले तर सोडवली जाते,
बोलले तर गुंतली जाते//६//

उर्मिला राऊत
फ्रेंड्स कॉलनी नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे