आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
सातबारा आयुष्याचा
पांडुरंग घोलप रोहोकडी, जुन्नर, पुणे

0
5
7
8
9
7
सातबारा आयुष्याचा
सातबारा आयुष्याचा
तसा कोराच राहिला
चिंता, व्यथा, जाणिवांचा
वृथा भार वाहिला
कडा पापण्यांच्या कशा
ओलावतात आजही
कळा अंतरीच्या सोसताना
भावनांचा बांध फुटला
हिशोब रोज झाला इथे
फक्त दिल्या घेतल्याचा
हृदयात जपलेल्यांनीच
आता डाव क्रूर मांडला
निसटून गेले सारे हातून
सांभाळले जे आजवर
ललाट रेषेनेही असा
विश्वासघात हा केला
सातबारा असाच निरंक
कर्मफळाचा सिद्धांत खोटा
कथा अभागी जीवनाची
श्वास अखेरचा कोंडला
पांडुरंग घोलप
रोहोकडी, जुन्नर, पुणे
0
5
7
8
9
7



