
श्रीमती कुसुम जवादे यांच्यातर्फे भिक्खू संघांतील २५ भंतेजींना ‘चिवर दान’
श्री झेनीथ व सौ विजेता जवादे यांनी केले सर्व भिक्खू संघांना धम्म व अर्थ दान
स्व. रामवतार जवादे पुण्यमोदन निमित्त भिक्खु संघातर्फे परित्रण पाठ संपन्न
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर (दि १८) : सेंट रिंझाई पब्लिक स्कूलचे संस्थापक स्व. रामवतार जवादे यांचे आज १५ वे पुण्यस्मरण जवादे यांच्या निवासस्थानी २५ भिक्खूंना चिवरदान करून संपन्न झाले. हा पुण्यमोदनाचा कार्यक्रम कांजी हाऊस चौक बिनाकी मंगलवारी येथील जवादे यांच्या राहत्या घरी संपन्न झाला.
स्व. रामवतार जवादे यांच्या पत्नी कुसुम जवादे , सुपुत्र संचालक झेनिथ जवादे व सून सौ विजेता जवादे यांच्या वतीने सर्व भिक्षूंना चिवर दान, धम्म दान करण्यात आले. परित्रण पाठास कुटुंबातील प्रा निलिमा डोंगरे, प्रा मनोज डोंगरे, श्रेयस डोंगरे, श्री राहुल पाटील, सौ पल्लवी पाटील, कु हर्षिता पाटील, श्री अशोक पाटील (मामा) चंद्रपूर, सौ उपासना वासनिक, स्वरा व श्राव्या वासनिक, अशोक गोंडाने, प्रशांत सोमकुवर आदीसह बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.



