ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध
साहित्याच्या दर्पणात
कुसुम पाटील कसबा बावडा, जि.कोल्हापूर

0
5
9
4
1
4
साहित्याच्या दर्पणात
शब्दांची गुंफण करून
कोरलीय शब्दलेणी
नवनवीन विचाराची
लिहीत गेलो काव्यवेणी
कधी लिहिल्या त्यातून
प्रेमाच्या आमृत झरा
कधी खळखळणारा
नदीचा प्रवाह धरा
साहित्याच्या दर्पणात काव्य
मधुमिलन विरहाचे गित
कधी ओव्यात गुंफलेले
सापडले जीवनाचे हित
काव्य ,ओवी ,चारोळी
अलंकारिक स्पर्शातून
खुलवी ओळीची कळी
गीत विरहाचे मधुमिलन
मनाच्या कोऱ्या कागदावर
उमटते सुखस्वप्नांची रेघ
तेव्हा अक्षरांची झाली गदीॅ
बरसणार श्यामल शब्द मेघ
यमक ,उपमा ,अलंकार
कधी अनुप्रासाची लय
साहित्याच्या दर्पणात विस्तारत
काव्या भोवती शब्दाचे वलय
कुसुम पाटील
कसबा बावडा, जि.कोल्हापूर
0
5
9
4
1
4



