
0
5
9
0
3
4
कळत कसे नाही
माणूस भाकरीत , अजून व्यस्त आहे !
कळत कसे नाही ,गरीब चस्त आहे !!
लोभाने मत्सराने , जिंदगी वाया गेली !
जीवन जगताना , चिंतेनी ग्रस्त आहे !!
सोनं चांदी हिर्याना ,नेहमी भाव देतो!
माहीती नाही याला ,प्रेमच सस्त आहे!!
चोरांचे मना भीती , तोच रात्र जागे!
जरीही त्याचे घरी , पहारे गस्त आहे !!
हातात हात घ्यारे ,दुबळ्या साथ द्यारे!
सूर्यासही शेवटी ,रोजच अस्त आहे !!
द्रुष्टांना रोगराई , जीवन संघर्षाचे !
सत्याने वागायचे , आयुष्य स्वस्थ आहे!!
विचार बा भीमाचे , आचरण करावे!
वेदा कुराणाहून . घटना मस्त आहे!!
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा.जि, यवतमाळ
0
5
9
0
3
4



