0
4
8
2
9
7
उपकार तुझे
उपकार तुझे झाले,मिळाला मान सन्मान।
बुद्ध प्रकाशाने भीमा ,दिले अंधारात ज्ञान।।
चौदा आँक्टोंबर दिनी,नागपूर क्रांती झाली।
हो सोनेरी किरणांची,प्रभा उजळूनी आली।।
धम्म चक्र फिरविले ,अम्हा केले गतिमान….
संकटे येतील जरी ,वाट सोडणार नाही।
वादळांना झेलताना , मागे हटणार नाही।।
लाचारी फेकून दिली,उंच झाली ताटमान….
अन्याय गुलामी बेड्या ,तोडूनी लेखणीने।
दास्यातुन मुक्त झाले , शुद्ध बुध्दं वाणीने।।
धन्य जाहला भीमा तु,लिहूनिया संविधान….
दावलास भारताला , दिशा प्रगती पथाची।
ही तुझ्याच पुण्याईने,सारी शान जीवनाची।।
गोवर्धना संगे बोला , जयभीम गुणगान …
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा
=========
0
4
8
2
9
7



