Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनखानदेशदादरा नगर हवेलीदेश-विदेशनवी दिल्लीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

श्रीकृष्णलीला आणि दहीहंडी अर्थात ‘गोपाळकाला’

संपादक

0 4 8 2 8 6

श्रीकृष्णलीला आणि दहीहंडी अर्थात ‘गोपाळकाला’

श्रीकृष्णाचा जन्म अनेक उद्देशांनी झाला होता. त्यांच्या जन्माच्या लीला अनेक आहेत त्यातल्या त्यात दहीहंडी ही देखील त्यांची एक लीला आहे. दही लोणी चोरण्याच्या कृष्णाच्या अनेक कथा मिळतात. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. यासाठी ते आपल्या मित्रांसोबत आजूबाजूच्या गवळणींच्या घरीही दही लोणी चोरी करत असत. कृष्ण जन्माष्टमी हा सण श्रावण महिन्याच्या अष्टमी तिथीला आणि दहीहंडीचा सण श्रावण महिन्याच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. हा सण नेहमी कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हा सण २७ ऑगस्टला मंगळवारी साजरा होणार आहे. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा आणि इतरही गवळणी दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.

श्रीमद्भागवत गीतेतील अध्यायांमध्ये सांगितल्याप्रमाणे बाळकृष्ण फारच नटखट होते. स्वतः राजपुत्र असूनही त्यांना गोपिकांच्या घरातील लोणी चोरून खाणे फार आवडायचे. त्यांच्या या नटखट स्वभावामुळे अनेकदा हे गोपगोपिका यशोदेकडे तक्रारी घेऊन यायचे पण तरी कान्हाने लोणी खाल्ले नाही तर सर्वच जण बेचैन व्हायचे. अनेकदा गोपिका लोणी लपवून एका मडक्यात बांधून ठेवत असे. मग हे बांधून ठेवलेले माठ फोडण्यासाठी आपल्या मित्रांच्या मदतीने बाळकृष्ण तिथपर्यंत पोहचून त्या गोष्टी फस्त करत असे. या लीलांचे प्रतिक म्हणून गोकुळाष्टमी नंतर दहीहंडी हा सण साजरा केला जातो. दहीहंडीच्या सणात मातीचे भांडे दही भरून दोरीवर टांगले जाते आणि गोविंदांचा एक गट पिरॅमिड बनवून हंडी फोडतो. हा सण प्रामुख्याने गुजरात आणि महाराष्ट्रात साजरा केला जातो. दहीहंडीच्या परंपरेत, भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या आठवणी समोर ठेवल्या जातात. दहीहंडीच्या उत्सवाला गोपाळकाला असेही म्हणतात.

संपादक
==========

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे