आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
बहर सरताना
स्वाती मराडे-आटोळे इंदापूर पुणे

0
5
2
4
6
3
बहर सरताना
बहर सरताना मनास
वाटले थोडे सुने..
विरताना दिसू लागले
फुललेले स्वप्न जुने..
बहर सरताना उगाच
का वाटले उदास..
मनासारखं जगूनही कशाची
राहिली ती आस..
बहर सरताना कशी
सुरू झाली पानगळ..
सुखदुःखाचा हिंदोळा
हा तर जीवनाचा खेळ..
बहर सरताना गेली
घरटे सोडून पाखरे..
भणंग या वृक्षाला आता
कुणी ना विचारे..
तरीही बहर सरताना
आस लागली नवी..
उन्हाळ झळा सोसायला
फुटेल पालवी नवी..!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर पुणे
0
5
2
4
6
3



